पालघर : खेळताना गच्चीवरुन पडल्‍याने चिमुरडीचा मृत्यू | पुढारी

पालघर : खेळताना गच्चीवरुन पडल्‍याने चिमुरडीचा मृत्यू

मनोर (पालघर) : पुढारी वृत्तसेवा : खेळताना तोल जाऊन दोन मजली इमारतीच्या गच्चीवरून पडल्याने दोन वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अकसा असिफ खान असे तिचे नाव आहे. शुक्रवारी (ता. २० ) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सफाळे पूर्वेकडील मीरानगर भागातील फातिमा अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, पेशाने जेसीबी मेकॅनिक असिफ शेख गेल्या काही वर्षांपासून कुटुंबासह मीरानगर भागातील फातिमा अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. शुक्रवारी सांयकाळी अकसा खान बिल्डिंगमधील अन्य मुलांसह गच्चीवर खेळत होती. खेळताना कठड्यावरून तिचा तोल जाऊन २५ ते ३० फूट खाली पडून गंभीर जखमी झाली.

यानंतर तिला सफाळे गावातील रुग्णालयात दाखल करण्‍यात आले.  येथे तिची प्रकृती चिंताजनक बनल्याने पुढील उपचारासाठी नालासोपारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर अकसाचा नालासोपारा येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचलंत का? 

Back to top button