विद्यार्थ्यांसाठी यंदाही सेतू अभ्यासक्रम राबविणार | पुढारी

विद्यार्थ्यांसाठी यंदाही सेतू अभ्यासक्रम राबविणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा

राज्यात दोन वर्षे कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी गेल्या वर्षाप्रमाणेच यंदादेखील दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात येणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर महिनाभर विद्यार्थ्यांची उजळणी घेण्यात येणार आहे.

१ हजार नव्‍हे ३ हजार कोटींचा घोटाळा, आशिष शेलारांकडून भूखंड घोटाळ्याप्रकरणी पुन्‍हा आरोप

एक चाचणीदेखील घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी दिली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे परिपूर्ण मूल्यमापन करणे शक्य झालेले नाही. गेली दोन वर्षे शाळा कधी बंद, कधी चालू, तर शिक्षण ऑफलाइन-ऑनलाइन असे सुरू आहे. त्यामुळे अर्धवट मूल्यमापनाच्या आधारेच विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलण्यात आले आहे.
विद्यार्थी जरी पुढच्या वर्गात गेले असले तरी त्यांच्या अनेक विषयांमधील महत्त्वाच्या घटकांच्या संकल्पना स्पष्ट झालेल्या नाहीत. हे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी आणि मागील घटकांमधील संकल्पनांची उजळणी करण्यासाठी सेतू अभ्यासक्रमाची निर्मिती ‘डायट’च्या माध्यमातून विद्या प्राधिकरण स्तरावर सुरू आहे.

महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेलेच सर्वात भ्रष्ट; संजय राऊतांचा सोमय्यांवर आरोप

13 जून रोजी शाळा सुरू झाल्याबरोबर सेतू अभ्यासक्रमाला प्रारंभ करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांची महत्त्वाच्या घटकांची उजळणी करण्यात येणार आहे. यातून विद्यार्थ्यांना विविध संकल्पना समजून घेण्यात मदत होणार आहे.

उत्तर प्रदेश सरकारचे मुंबईत कार्यालय, योगी सरकारचा मोठा निर्णय

सेतू अभ्यासक्रमाचा ग्रामीण भागात चांगला फायदा…

राज्याच्या ग्रामीण भागात विजेचे भारनियमन आणि ऑनलाइन शिक्षणाच्या अपुर्‍या सुविधा, यामुळे शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी सेतू अभ्यासक्रमाचा चांगला फायदा होणार असल्याची माहिती ग्रामीण भागातील एका शिक्षकाने दिली आहे.

राज्यातील दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी या वर्षीदेखील नव्याने सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात येत असून, तो शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस संपूर्ण एक महिना राबविण्याचे नियोजन आहे.

– एम. डी. सिंह, संचालक, विद्या प्राधिकरण शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी सेवा केंद्र

उच्च शिक्षण संस्थांमध्ये समुपदेशक

देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी समुपदेशकाची नियुक्ती करण्यासह विद्यार्थी सेवा केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या संगीत विद्यापीठास भारती विद्यापीठाने सहकार्य करावे : देशमुख

याद्वारे विद्यार्थ्यांमधील ताणतणाव आणि नैराश्य दूर करणे, विद्यार्थ्यांची शिक्षणातील गळती रोखण्याचा प्रयत्न असून, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विद्यार्थी सेवा केंद्र एक खिडकी पद्धतीने काम करेल. त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्रसिद्ध केल्या आहेत. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात विद्यार्थ्यांचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य उत्तम राहण्याबाबत उच्च शिक्षण संस्थांमध्ये समुपदेशक आणि करिअर मार्गदर्शक उपलब्ध करण्याची तरतूद आहे.

The Kashmir Files : विवेक अग्निहोत्रीच्या द कश्मीर फाईल्सवर सिंगापूरमध्ये बंदी

विद्यार्थ्यांबाबतीत होणारे शोषण, शारीरिक, सामाजिक, भेदभावजन्य, सांस्कृतिक, मानसिक, भाषिक ताण येऊ नये या दृष्टिकोनातून विद्यार्थी सेवा केंद्राद्वारे दूरध्वनी, व्यक्तिगत, आवश्यकतेनुसार समूह समुपदेशन सत्र घेतले जाईल. केंद्रामध्ये किमान काही व्यावसायिक समुपदेशकांची नियुक्ती करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Back to top button