सोलापूर : रवनाथवाडी येथे एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक, दाेघे गंभीर जखमी | पुढारी

सोलापूर : रवनाथवाडी येथे एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक, दाेघे गंभीर जखमी

आढीव (सोलापूर), पुढारी वृत्तसेवा
रवनाथवाडी येथे एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. पंढरपूर तालुक्यातील भैरवनाथ वाडीजवळ नाईक नवरेमळा येथे रविवारी (दि.१७) सकाळी साडेअकरा वाजता ही दुर्घटना घडली. कारमधील दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक लोकांच्या मदतीने त्‍यांना पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

देवदर्शन करून लातूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या कारची (गाडी नंबर MH 11 Bv 1942) उस्मानाबादहून- कोल्हापूरकडे जाणाऱ्या उस्मानाबाद- कोल्हापूर (गाडी नंबर MH-13 CU 7927) या एसटी बसची समोरासमोर धडक झाली. या अपघाताची माहिती मिळताच, अभिजित पाटील  यांनी घटनास्थळी धाव घेत अँब्युलन्स उपलब्ध केली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्‍यात आले. यावेळी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अशोक जाधव, नितीन चवरे, सुजित उबाळे घटनास्‍थळी धाव घेतली .

हेही वाचलत का ?

Back to top button