नाशिक : झाडाखाली मृतदेह आढळल्याने खळबळ | पुढारी

नाशिक : झाडाखाली मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा
वणी-लखमापुर शिवारात शनिवारी (दि. 16) अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला असून प्रथमदर्शनी सदर व्यक्तीची हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी वणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लखमापूर शिवारातील कादवा नदीवरील अवनखेड पुलाजवळील हॉटेलच्या पाठीमागे शेतात झाडाखाली एका अज्ञात व्यक्तीचे वय सुमारे 60 ते 65 वर्षे याचा मृतदेह सापडला असून सदर व्यक्तीच्या चेहर्‍यावर जबर मार लागलेला आहे. प्रथम दर्शनी ही हत्या असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून वणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचे कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

हेही वाचा :

Back to top button