उल्हासनगर कसबा : ४ वर्षांच्या चिमुकलीवर ९ वर्षीय मुलाने केले अत्याचार | पुढारी

उल्हासनगर कसबा : ४ वर्षांच्या चिमुकलीवर ९ वर्षीय मुलाने केले अत्याचार

पुढारी ऑनलाईन डेस्क : साडेचार वर्षांच्या चिमुकलीवर ९ वर्षांच्या मुलाने अत्‍याचार घडल्याची घटना उल्हासनगर कसब्यात घडली आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. “पीडित चिमुकलीच्या आईने ही तक्रार दाखल केलेली आहे. ३ एप्रिलला संबंधित ९ वर्षांचा मुलाने खेळण्याच्या निमित्ताने चिमुकलीला निर्मनुष्य ठिकाणी नेते आणि तिच्यावर अत्याचार केले.”, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, “चिमुकलीला शारीरिक त्रास होऊ लागल्‍यानंतर  तिच्‍यावर झालेल्‍या अत्याचाराची घटना उजेडात आली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात कलम ३७६  लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण कायदा (POCSO) यानुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे.”

हेही वाचा? 

Back to top button