स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांसाठी मेगा भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन
स्टाफ सिलेक्शन कमिशन

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून (दि.१७ जुलै) सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय सशस्त्र सीमा दले तसेच एनआयए, एसएसएफमध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी आणि आसाम रायफल्समध्ये रायफलमॅन पदाची भरती केली जात आहे.

अधिक वाचा :

सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी), सशस्त्र सीमा दल (एसएसबी), सेक्रेटेरिएट सिक्योरिटी फोर्स (एसएसएफ) मध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी भरती केली जात आहे.

तर आसाम रायफल्समध्ये रायफलमॅन (जनरल ड्युटी) पदांच्या भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

अधिक वाचा :

ही भरती प्रक्रिया कम्युटर सीबीई), शारिरीक क्षमता चाचणी (पीईटी), शारिरीक मानक चाचणी (पीएसटी), वैद्यकीय चाचणी परीक्षा आणि कागदपत्रे पडताळणी आदींवर आधारीत आहे.

अधिक वाचा :

इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदत आहे. यासाठी ऑनलाईन फी भरण्यासाठी अंतिम तारीख २ सप्टेंबर आहे.

अधिक माहितीसाठी https://ssc.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : भात लावणीचं काम चालतं कसं ,चला पाहूया

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news