चंद्रकांत मैगुरे शिवसेना मिरज शहरप्रमुख यांना अटक

चंद्रकांत मैगुरे
चंद्रकांत मैगुरे
Published on
Updated on

मिरज; पुढारी वृत्तसेवा : चंद्रकांत मैगुरे शिवसेना मिरज शहरप्रमुख यांना पोलिसांनी अटक केली. येथील रेल्वे ठेकेदाराचा कोरा धनादेश व आरटीजीएस पावती चोरून ठेकेदाराच्या खात्यातून आपल्या खात्यात 20 लाख रुपये वर्ग करून घेतले. तसेच 15 लाख रुपये काढून चोरी केल्याप्रकरणी शिवसेना मिरज शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे यांना महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक केली.

त्यांना शुक्रवारी न्यायालयत हजर केले असता चार दिवस पोलिस कोठडी देण्यात आली.

मधुकुमार (रा. माहेश्‍वरी निवास, सांगली) यांनी याबाबत सहा महिन्यापूर्वी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर चंद्रकांत मैगुरे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्जफेटाळल्याने शुक्रवारी मैगुरे यांना अटक करण्यात आली.

मधुकुमार हे रेल्वेचे ठेकेदार आहेत. त्यांच्या कंपनीचे मिरजेतील बँक ऑफ इंडिया बँकेत करंट खाते आहे. मधुकुमार यांची सही असलेला कोरा धनादेश व एक आरटीजीएस पावती काही महिन्यापूर्वी चोरीला गेली होती.

चोरलेला कोरा धनादेश व आरटीजीएस पावतीचा वापर करुन कंपनीच्या खात्यातील 20 लाख रुपये दि. 26 आक्टोबर 2020 रोजी चंद्रकांत मैगुरे यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती. जमा झालेल्या रकमेपैकी 15 लाख रुपये मैगुरे यांनी काढून घेतल्याची तक्रार मधुकुमार यांनी पोलिसात दिली होती.

याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news