सातारा क्राईम : पैशासाठी वृद्धेला जाळून मारले; झोपडीसह दिले पेटवून

वाशी येथे संशयिताने पेटवलेल्या झोपडीत वृद्धा जळून खाक झाली.
वाशी येथे संशयिताने पेटवलेल्या झोपडीत वृद्धा जळून खाक झाली.
Published on
Updated on

दहिवडी : पुढारी वृत्तसेवा

जाशी (ता. माण) येथे झोपडीसह पेटवून देत एका वृद्धेला जाळून मारल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली. त्याने पैशासाठी हा प्रकार केल्याची कबुली पोलिसांजवळ दिली. दरम्यान, या घटनेने संताप व्यक्‍त होत आहे.

वाशी येथे संशयिताने पेटवलेल्या झोपडीत वृद्धा जळून खाक झाली.
वाशी येथे संशयिताने पेटवलेल्या झोपडीत वृद्धा जळून खाक झाली.

श्रीमती सीताबाई जयसिंग गलांडे (वय 72) असे त्या वृद्धेचे नाव आहे. तर नाना दिगंबर गलांडे (वय 20, रा. जाशी, ता. माण), असे संशयिताचे नाव आहे. जाशी येथील सीताबाई गलांडे ही वृध्दा पतीच्या मृत्यूनंतर एकट्याच घरी राहत होत्या. त्यांना मुलबाळ नसल्याने त्यांच्या घरी कोणीच नसायचे. त्यांच्या शेजारी राहणारा नाना गलांडे हा त्यांना पैशासाठी वारंवार त्रास देत होता.

दि. 5 जानेवारी रोजी रात्री नाना गलांडेने वृध्देची झोपडी पेटवून दिली  आहे. जवळपास कोणीच नसल्याने या घटनेची कोणालाच चाहूल लागली नाही. दोन दिवसानंतर वृद्धेचा भाचा तेथे आला असता त्यांना सीताबाई राहत असलेली झोपडी जळाल्याचे दिसले. त्यामध्ये सीताबाई याही जळून मृत झाल्याचे दिसले. त्यानंतर नातेवाईक उत्तम हरिबा चोरमले यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीमध्ये पैशासाठी नाना गलांडे त्रास देत होता. त्यामुळे त्याच्यावर संशय व्यक्‍त केला. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी पंचनामा केल्यावर दहिवडी पोलिसांनी संशयिताला अटक केली. संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला दहिवडी न्यायालयाने दि. 13 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास सपोनि संतोष तासगावकर करीत आहेत.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news