पुणे ; पुढारी वृत्तसेवा : महालक्ष्मी एक्सप्रेस आणि डेक्कन एक्सप्रेसची आजपासून सेवा पूर्ववत होणार आहे, दरम्यान मागच्या काही दिवसांपासून अडकलेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. बोरघाटातील कोसळलेल्या दरडीमुळे आणि साचलेल्या पाण्यामुळे महालक्ष्मी एक्सप्रेस आणि डेक्कन एक्सप्रेस या रेल्वे गाड्या बंद होत्या.
बोरघाटातील दरड कोसळलेला भाग रिकामा करण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून युध्दपातळीवर सुरू आहे.
तसेच, मार्गावर साचलेले पाणी देखील आता ओसरत आहे.
रद्द करण्यात आलेली पुणे-मुंबई-पुणे (डेक्कन एक्सप्रेस), आणि कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर (महालक्ष्मी एक्सप्रेस) आज रविवार (दि.२५) पासून पुर्वव्रत सुरू करण्यात आली आहेत.
प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, इंद्रायणी आणि कोयना एक्सप्रेस पुढील तीन दिवस रद्द राहणार आहेत.
गेले दोन दिवस मुसळधार पावसाचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला.
काही ठिकाणी दरड कोसळल्याने व मार्गांवर पाणी साचल्यामुळे रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी काही गाड्या रद्द केल्या होत्या.
परिणामी प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली होती.
मात्र, शनिवारी पावसाने उघडीप घेतल्याने आणि रेल्वे प्रशासनाने दरड हटविण्याचे काम युध्द पातळीवर सुरू केल्याने मुंबईला जाणार्या रेल्वेच्या काही गाड्या धावल्या. यात लांब पल्ल्याच्या गाड्यांसह चाकरमान्यांची लाडकी डेक्कन क्वीन देखील शनिवारी धावली.
हे ही पाहा