पोलिस भरती २०१९ साठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर

पोलिस भरती २०१९ साठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर
Published on
Updated on

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : पोलिस भरती २०१९ साठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे पासवर्ड व विकल्प निवडण्यास सांगण्यात आले होते. तसेच सर्व उमेदवारांना पासवर्ड बदलण्यास सांगण्यात आले होते. मात्र यासाठी अर्ज केलेले काही उमेदवार त्यांचा ईमेल आयडी विसरलेले आहेत किंवा लक्षात नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

अशा उमेदवारांना त्यांचा पासवर्ड, इमेल आयडी अपडेट करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २ चे समादेशक सहाय्यक लक्ष्मण उत्तेकर यांनी पत्रकाद्वारे दिली.

पोलीस भरती २०१९ मधील विविध पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी ५ ऑगस्ट रोजी शुद्धीपत्रक काढले होते. यामध्ये उमेदवारांना त्यांचे पासवर्ड व विकल्प निवडण्याबाबत कळवण्यात आले होते. तसेच पासवर्ड बदले गरजेचे आहे, अन्यथा ते पुढील भरती प्रक्रियेत आपले आवदेन पत्र उघडू शकणार नाहीत.

याशिवाय एसईबीसीच्या उमेदवारांना अराखीव ( खुला ) किंवा ईडब्ल्यूएस (ews) या पैकी एक विकल्प देणे गरजेचे आहे.

मात्र, काही उमेदवार आपला ईमेल आयडी विसरले आहेत. या पार्श्वभूमीवर जे उमेदवार ईमेल आयडी विसरले असतील किंवा लक्षात नसतील त्यांना ईमेल अपडेट करण्यासाठी आणि विकल्प निवडण्यासाठी २२ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री १२ पर्यंत आपली माहिती अपडेट करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

उमेदवारांनी www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ' पोलिस कॉर्नर ' या बटनवर क्लिक करून ' पोलिस भरती २०१९ ' येथे क्लिक करावे.

संबंधित घटकनिहाय संकेतस्थळावर जाऊन विकल्प द्यावा अथवा ईमेल / पासवर्ड बदल करुन घ्यावा . असे पत्रकात नमूद केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news