शर्लिन चोप्रा – राज कुंद्रा च्या ‘त्या’ फोटोने सोशल मीडियात उडाली खळबळ
राज कुंद्रा पॉर्नफिल्म प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणात शर्लिन चोप्रा देखील चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. या प्रकरणात ती महत्वाची साक्षीदार आहे. पण, तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे चांगलीच खळबळ माजली आहे.
शर्लिन चोप्रा ने आपल्या ट्विटर अकाऊंटवर फोटो शेअर करत कॅप्शनही दिले आहे. या फोटोत ती राज कुंद्रा सोबत बसलेली दिसते. तिने या फोटोला '२९ माचर २०१९ चा दिवस होता. आम्सप्राईम द्वारे आयोजित 'द शर्लिन चोप्रा' अॅपचे पहिले शूट होणार होते. माझ्यासाठी हा एक नवा अनुभव होता. कारण मी कोणत्या तरी अॅपसोबत पहिल्यांदाच जोडली जाणार होते. अशावादी आणि जोशपूर्ण वातावरण होते.' असे कॅप्शन दिले.
शर्लिन चोप्राचा हा फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. मात्र या फोटोची सत्यात अजून सिद्ध झालेली नाही. दरम्यान, एनएनआयला दिलेल्या मुलाखतीत शर्लिन चोप्राने राज कुंद्रा तिच्या संपर्कात होता असे सांगितले होते. राज कुंद्राने तिच्यासोबत करारही केला असल्याचा दावा शर्लिन चोप्राने केला होता.
चोप्राने केलेल्या दाव्यानुसार राज कुंद्रा या अॅपमध्ये फॅशन फिटनेस आणि ग्लॅमरस व्हिडिओ अपलोड करणार होता. या अॅपची सुरुवातही ग्लॅमर व्हिडिओने झाली पण, त्यानंतर तेथे अर्धनग्न आणि नंतर पूर्ण नग्न व्हिडिओही सुरु झाले.
शर्लिन चोप्राने राज कुंद्रा विरोधात पहिल्यांदा महाराष्ट्र क्राईम ब्रांचकडे गेले होतो असे सांगितले. राज कुंद्रा कायम मला प्रोत्साहन द्यायचा असाही दावा शर्लिन चोप्रा करते.
हेही वाचले का?
- पावभाजी चमचमीत लालभडक घरच्याघरी कशी कराल?
- लघवीची 'ही' सवय करेल तुमच्या आरोग्यावर परिणाम
- Kisan credit card scheme : शेतकऱ्यांसाठीची 'एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह' योजना तुम्हाला माहिती आहे का?
- #Sanjay Raut: चुकीचा इव्हेंट कसा करावा हे तुमच्याकडून शिकावे
- स्तनपान (breast feeding) : बाळाचे पोट भरले आहे कसे ओळखावे?
पाहा व्हिडिओ : बोरीवलीत बनलाय चक्क नो किसिंग झोन
https://youtu.be/himRwgmAiXI

