अरूण गवळी ला संचित रजा मंजूर:चार महिने डॉन राहणार कारागृहाबाहेर | पुढारी

अरूण गवळी ला संचित रजा मंजूर:चार महिने डॉन राहणार कारागृहाबाहेर

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी याला न्यायालयाने संचित रजा मंजूर केल्यामुळे आता पुढील चार महिने डॉन कारागृहाबाहेर राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चार आठवड्यांची संचित रजा (फरलो) अरूण गवळी ला मंजूर केली आहे.

अरूण गवळी ने कुटुंबीयांना भेटण्यासाठी संचित रजा मिळावी म्हणून कारागृह प्रशासनाकडे अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज खारीज करण्यात आला होता. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेत फौजदारी याचिका दाखल केली.

कारागृह प्रशासनाने फरलो नामंजूर केल्यानंतर अरुण गवळीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.

संचित रजा मंजूर केल्यास कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यात येईल, अशी हमी देण्यात आली. तसेच यापूर्वीच्या रजेच्या वेळी कोणताही गुन्हा झाला नाही, असा दावा करण्यात आला.

तेव्हा न्यायालयाने संचित रजा मंजूर केली. अरुण गवळी हा यापूर्वी किमान आठ वेळा कारागृहातून बाहेर आला आल्याची माहिती आहे.

या प्रकरणी झालेल्या मागील सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावत यावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेत गवळीला चार आठवड्यांची संचित रजा मंजूर केली आहे.

शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणात गवळीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

तो सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. गवळीतर्फे अ‍ॅड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली.

हे हा पाहा :

Back to top button