कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड मिश्रणासंबधी अभ्यासाला 'डीसीजीआय'ची मंजूरी! | पुढारी

कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड मिश्रणासंबधी अभ्यासाला 'डीसीजीआय'ची मंजूरी!

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : देशाच्या औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या कोरोना विरोधी लशींच्या एकत्रित प्रभावासंबंधी करण्यात आलेल्या अभ्यासाला मंजूरी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

वेल्लोर येथील खिश्च्रन वैद्यकीय महाविद्यालयाकडून यासंबंधीच्या क्लिनिकल ट्रायल घेण्यात आल्या होत्या. चाचणीतून बरेच सकारात्मक निष्कर्ष समोर आल्याने या दोन्ही लशी एकत्रितरित्या अधिक प्रभावी असल्याचे बोलले जात आहे. याच आधारे या अभ्यासाला मंजूरी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

२९ जुलैला भारताच्या औषध महानियंत्रकांच्या (डीसीजीआय) एक विशेषतज्ञांच्या समितीने कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड कोरोना लशींचा एकत्रित डोसवर अभ्यास करण्याची शिफारस केली होती. ख्रिश्चन वैद्यकीय महाविद्यालयाकडून (सीएमसी) यासंबंधी परवानगी मागण्यात आल्यानंतर ही शिफारस करण्यात आली होती.

लशीचा कोर्स पूर्ण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला दोन वेगवेगळ्या लशींचा डोस दिला जावू शकतो का? जर कुणाला कोव्हिशील्डचा एक डोस आणि कोव्हॅक्सिनचा एक डोस दिला तर तो प्रभावकारक ठरेल का? याचा शोध घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला होता, अशी माहिती सेंट्रल ड्रस्ग स्टॅंन्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या (सीडीएससीओ) विषयतज्ञ समितीकडून देण्यात आली होती.

कोव्हॅक्सिन तसेच कोव्हिशीड या कोरोना लशीचा एकत्रित डोसचा कॉकटेल देवून करण्यात आलेल्या अभ्यासात एडिनोव्हायरस वेक्टर प्लॅटफॉर्म-बेस्ड व्हॅक्सिनच्या एकत्रित करणाने लस सुरक्षित तसेच रोगप्रतिरोधक क्षमतावर्धक आढळल्याचे निष्कर्ष आयसीएमआरने वर्तवले आहे.

 

Back to top button