मुंबई; पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील ओम आणि स्वीटूची 'येऊ कशी तशी मी नांदायला'. ( yeu kashi tasi me nandayla ) ही मालिका चाहत्यांच्या घराघरात पोहोचली आहे. या मालिकेत ओमची भूमिका शाल्व किंजवडेकर तर स्वीटूची भूमिका अन्विता फलटणकर हिने साकारली आहे. सध्या ही मालिका विशिष्ट वळणावर येऊन पोहोचली आहे. यात शेवटी ओम आणि स्वीटूचे लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत.
शाल्व किंजवडेकर आणि अन्विता फलटणकर यांनी आपआपल्या इन्स्टाग्रामवर नुकतेच दोघांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अन्विता म्हणजे, स्वीटूने लाल रंगाच्या साडीत नववधूच्या वेशभूषेत दिसत आहे. तर ओम म्हणजे, शाल्वने पांढऱ्या रंगाच्या शेरवाणीसह फेट्यात दिसत आहे. याचसोबत स्वीटूने केसांत गजरा माळलेला असून दोघांनी वरमाळा परिधान केल्याचे दिसते. ओमने या फोटोच्या कॅप्शमध्ये 'Omkar aur sweetu ki shaadi!' असे लिहिले आहे.
हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी भरभरून आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एकाने दोघांना लग्नाच्या शुभेच्छा देत 'कोणाची नजर लागू नये' असे म्हटले आहे.
बरेच दिवसांपासून ओम आणि स्वीटूच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. मध्यतरी, दोघांच्या लग्नात एक ट्वीस्ट आले होते. यावेळी ओम लग्नात वेळेवर पोहोचू न शकल्याने स्वीटूला मोहितच्या गळ्यात वरमाळा घालावी लागली होती. परंतु, हे लग्न फार काळ टिकले नाही. शेवटी मोहित आणि स्वीटू मालिकेत विभक्त झालेले दाखविले आहे.
यानंतर स्वीटू आपल्या गावी गेली आहे. ही गोष्ट ओमला समजताच ओम स्वीटूला भेटण्यास गावी गेला असून त्याने तिच्याशी लग्न केले आहे. झालेल्या लग्नामुळे चाहत्यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
या लग्नाचे शूटींग रत्नागिरीतील जयगडमध्ये पार पडले आहे. लग्नानंतर ही मालिका चाहत्यांचा निरोप घेणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे हि मालिकेत नेमके पुढे काय होणार आहे याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
हेही वाचलंत का?
(photo : shalva_kinjawdekar, Anvita Phaltankar and yeukashitasimenandaylaofficial instagram वरून साभार)