mlc bawankule : उमेदवार ठरविण्यावरून एकमत न झाल्याने काँग्रेसचा दारूण पराभव

mlc bawankule : उमेदवार ठरविण्यावरून एकमत न झाल्याने काँग्रेसचा दारूण पराभव
Published on
Updated on

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी एका जागेवर १० डिसेंबर रोजी मतदान झाले. त्याची मतमोजणी मंगळवार १४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात पार पडली. ८ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरूवात झाली. आणि ९.१० मिनिटांनी पहिले चित्र स्पष्ट झाले. त्यातच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयाची औपचारिकता बाकी असल्याचे दिसून आले. (mlc bawankule)

बावनकुळे यांना ३६२, काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ व काँग्रेसचे अधिकृत उमेदवार छोटू भोयर यांना केवळ एक मत मिळाले. तेही त्यांचे स्वत:चे असल्याची चर्चा नंतर कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती. या निमित्ताने बंडखोर स्वयंसेवकाला चांगलीच अद्दल घडल्याची भाजपा कार्यकर्त्यांची भावना आहे.

mlc bawankule : मोठ्या मतांच्या फरकाने बावनकुळे विजयी

या मतमोजणीत ५४९ मते वैध ठरली. विजयी उमेदवारासाठी २७५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता.

पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीतच चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२, डॉ. छोटू भोयर यांना १ व मंगेश देशमुख यांना १८६ मते मिळाली. तर ५ मते अवैध ठरली. बावनकुळे यांनी पहिल्याच फेरीत कोटा पूर्ण केल्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी विमला आर. यांनी बावनकुळे यांना विजयी घोषीत केले.

बावनकुळे १७६ मतांनी विजयी झाले. भाजपाकडे स्वत:ची ३१८ मते होती. असे असताना बावनकुळे यांना ३६२ मते मिळाली. म्हणजे ४४ मते जास्त मिळाली.

महाविकास आघाडीकडे २४० मते होती. त्यांच्या उमेदवाला १८६ मते मिळाली.

शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यांच्या बाजूने असल्यामुळे तेवढी तरी मते त्यांना मिळाली. म्हणजे महाविकास आघाडीची ५४ मते फुटली

महाविकास आघाडीची ५४ मते फुटली

या निवडणुकीत आयातीत उमेदवारामुळे काँग्रेसला हात चोळीत राहावे लागले.

उमेदवार ठरवण्यावरून एकमत न झाल्यामुळे ऐनवेळी स्वयंसेवक असलेल्या डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना आयात करून उमेदवारी द्यावी लागली.

त्यांनी कच खाल्याने शेवटच्या क्षणी पूर्वाश्रमीचे युवक काँग्रेस कार्यकर्ते व आता अपक्ष नगर सेवक मंगेश देशमुख यांना समर्थन द्यावे लागले. त्याच वेळी काँग्रेसच्या पराभवाची बीजे रोवली गेली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news