नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा
देशात तब्बल ५७१ दिवसांनी दैनंदिन कोरोना बाधितांच्या संख्येत ( corona virus update ) संख्येत निच्चांकी घट पाहायला मिळाली आहे. सोमवारी (दि. १३) रोजी दिवसभरात केवळ ५ हजार ७८४ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, २५२ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दिलासादायक बाब म्हणजे, दिवसभरात ७ हजार ९९५ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली.
देशाचा कोरोनामुक्ती दर मार्च २०२० नंतरचा सर्वोच्च ९८.३७ % मंगळवारी नोंदविण्यात आला. देशातील एकूण कोरोनामुक्तांची ( corona virus update ) संख्या ३ कोटी ४१ लाख ३८ हजार ७६३ पर्यंत पोहोचली आहे. तर, ८८ हजार ९९३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने आतापर्यंत ४ लाख ७५ हजार ८८८ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला.
मंगळवारी देशाचा दैनंदिन कोरोना संसर्ग दर ०.५८ टक्के नोंदविण्यात आला. तर, आठवड्याचा कोरोनासंसर्ग दर ०.६८ टक्के नोंदवण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १३३.८८ कोटी डोस नागरिकांनी देण्यात आलेले आहेत.
केंद्र सरकारकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत १ अब्ज ४० कोटी ३८ लाख ७५ हजार ६५० डोस पुरविण्यात आले आहेत. यातील १७ कोटी ६ लाख १३ हजार ६६१ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशभरात आतापर्यंत ६५ कोटी ७६ लाख ६२ हजार ९३३ कोरोनाची तपासणी करण्यात आली आहे. यातील ९ लाख ९० हजार ४८२ तपासण्या सोमवारी करण्यात आल्याचे आयसीएमआरकडून सांगण्यात आले आहे.
१) आरोग्य कर्मचारी ९६,०७,३१६
२) फ्रंटलाईन वर्कर्स १,६७,०५,१६६
३) १८ ते ४४ वयोगट २७,३९,५१,७१२
४) ४५ ते ५९ वयोगट १३,४५,४०,०६३
५) ६० वर्षांहून अधिक ८,६५,५३,८१८
हेही वाचलंत का?