नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन डेस्क
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतन वाढीबाबत नवीन वर्षांत खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनात वाढ करण्याचा सरकारचा विचार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मोदी सरकार फिटमेंट फॅक्टर वाढविण्याचा विचार करत आहे. फिटमेंट फॅक्टर केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन निश्चित करते. कर्मचाऱ्यांच्या पगार निश्चितीसाठी फिटमेंट फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आहे. जर मोदी सरकारने फिटमेंट फॅक्टर वाढवल्यास कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात म्हणजे बेसिक सॅलरी (Minimum Basic Pay) वाढून २६ हजार रुपये होऊ शकते.
फिटमेंट फॅक्टर याआधी २०१६ मध्ये वाढवण्यात आला होता. फिटमेंट फॅक्टर लागू केल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान बेसिक वेतनात ६ हजार रुपयांवरून १८ हजार रुपयांपर्यंत वाढ झाली होती. आता फिटमेंट फॅक्टरमध्ये संभाव्य वाढ झाल्यास किमान बेसिक वेतन २६ हजार रुपयांवर जाऊ शकते. सध्या किमान बेसिक वेतन १८ हजार रुपये आहे.
जर बेसिक वेतन १८ हजार रुपयांवरुन वाढून २६ हजारांवर झाले तर महागाई भत्त्यातदेखील वाढ होईल. महागाई भत्ता (Dearness Allowance) बेसिक वेतनाच्या ३१ टक्के असतो.
एका वृत्तानुसार, केंद्र सरकार २०२२ च्या सुरुवातीला महागाई भत्त्यात ३ टक्के वाढीची घोषणा करु शकते. ३ टक्के भत्ता वाढवल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० हजार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. याआधी ११ टक्के वाढ केल्याने सध्या महागाई भत्ता ३१ टक्के एवढा आहे.
हे ही वाचा :