नाशिक : पुढारी ऑनलाईन
एखाद्या परीक्षेचा पेपर फूटणे हे पहिल्यांदा होत नाही. यापूर्वीही अनेकवेळा असे प्रकार घडले आहेत; पण ज्यांनी पेपर फाेडणारे आजही एकत्र असल्याने असे प्रकार वारंवांर घडतात, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांन आज व्यक्त केले.
औरंगाबाद दौऱ्यावर ( Raj Thackeray Aurangabad Tour ) असलेल्या राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सरकारी नाेकर्यांसाठी घेणार्या देणार्या परीक्षांचे पेपर वारंवार फुटतात. पेपर फाेडणारे आजही एकत्र आहेत. त्यांच्यावर शासनाचा वचक नाही.
आपल्या देशात निवडणूका होतचं राहतील, कोरोनानंतर बाहेर पडलो आहे याचा अर्थ असा नाही की, मी निवडणुकीसाठी बाहेर पडलो आहे. फेब्रुवारीनंतरही निवडणुका होईल असेही नाही. ज्या ठिकाणी निवडणुका हाेणार आहेत, त्यांची खात्री नाही. त्या आणखी काही महिने पुढे जातील.
मी बाहेर पडलो याला काहीतरी अर्थ असणारचं ना. माझा राजकीय पक्ष आहे त्यामुळे माझ्या दाैर्याला काही अर्थ असणारच. मी जेव्हा बाहेर पडणार तेव्हा लोकांशी संवाद साधणार. मला नाशिकला विचारलं तुमची रणनिती काय? मग काय रणनिती सांगायाची का?" निवडणुका पुढे होतील कि नाही, याची कोणतीही खात्री नसताना मी बाहेर पडलो असेल किंवा माझ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचलं का?