विराट-रोहितच ‘नाटक’ नकोच… KL राहुलाच कॅप्टन करूया!

KL Rahul Captain : विराट-रोहितच नाटकंच नको.. KL राहुलाच कॅप्टन करूया!
KL Rahul Captain : विराट-रोहितच नाटकंच नको.. KL राहुलाच कॅप्टन करूया!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाच्या वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्माची दुखापत आणि कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीची रजा यामुळे बीसीसीआयसमोर नवे संकट उभे राहिले आहे, ते म्हणजे कर्णधारपदाचे संकट. दोन्ही खेळाडूंमधील वाद उफाळल्याचेही वृत्त समोर येत आहे. आता दक्षिण आफ्रिकेसारख्या महत्त्वाच्या दौऱ्याला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. यातच वनडे मालिकेसाठी संघाच्या कर्णधारपदी काेणाची निवड करायची, असा प्रश्न बीसीसीआयला पडला आहे. अशातच केएल राहुलचे (KL Rahul Captain) नाव आघाडीवर येत असून, त्याच्या नेतृत्वाला संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची पसंती असल्याचे समजते.

कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. तर विराट कोहलीने कुटुंबाला वेळ देण्याच्या कारणामुळे माघार घेतली आहे. पण, रोहित आणि विराटमधील वाद उफाळा असल्याने दोघांनी एकत्र न खेळण्याचा निर्णय घेतल्याचा शंका उपस्थित हाेत आहे. आता केएल राहुलला वनडे संघाचा उपकर्णधार बनवण्याची चर्चा होती अशा स्थितीत बीसीसीआयने त्याच्याकडे कर्णधारपद (KL Rahul Captain) सोपवले तर नवल नसेल असेही अनेकांनी व्यक्त केले आहे.

युवा कॅप्टनचा शोध… (KL Rahul Captain)

विराट कोहलीची उचलबांगडी केल्यानंतर 'बीसीसीआय'ने वनडे संघाचे कर्णधार पद रोहित शर्माकडे सोपवले. तो सध्या ३४ वर्षांचा आहे, तर विराट कोहली 33 वर्षांचा आहे. त्यामुळे हे दोघेही दीर्घकाळ कर्णधारपदी राहतील की नाही याबाबत साशंकता आहे. अशातच बीसीसीआयला कसोटी, टी २० आणि वनडे संघाच्या नव्या कॅप्टनाचा शोध घेणे गरजेचे आहे. एकदिवसीय सामन्यांसाठी ऋषभ पंत, श्रेयस अय्यर यांची नावे आघाडीवर आहेत; पण कुल आणि प्रतिभावान केएल राहुल सातत्यपूर्णतेच्या बाबतीत दोघांपेक्षाही सरस असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. या सर्वांना आयपीएलमधील कर्णधारपदाचा अनुभव आहे आणि दडपण कसे हाताळायचे हे देखील माहित आहे. मात्र, येत्या काही वर्षांत 'बीसीसीआय' अनेक युवा खेळाडूंना कर्णधार म्हणून संधी देऊ शकेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दाेन 'राहुल'मधील ट्यूनिंग टीम इंडियाला ठरणार फायदेशीर

केएल राहुल  हा राहुल द्रविड यांना आपला आदर्श मानतो. दोघेही कर्नाटकमधील आहेत. राहुल द्रविड यांनी केएल राहुलच्या फलंदाजीचे आणि तंत्राचे अनेकवेळा समर्थन केले आहे. अशा स्थितीत दोघांमधील ट्यूनिंग टीम इंडियासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. मात्र, द्रविडने खुल्या मंचावर कर्णधारपदासाठी राहुलला कधीही पाठिंबा दिला नाही; पण  बीसीसीआयने केएल राहुलच्या नावाचा विचार वनडे संघाच्या कर्णधार पदासाठी केला तर प्रशिक्षक द्रविड नक्कीच त्याला मदत करतील, अशी शक्‍यता व्‍यक्‍त हाेत आहे.

केएल राहुलच्या नावावर सर्वाधिक धावा…

१ जानेवारी २०२० पासूनचे भारतीय फलंदाजांचे वनडे रेकॉर्ड तपासले तर केएल राहुलने सर्वाधिक २ शतके झळकावली आहेत. यादरम्यान तो सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने १२ डावात ६२ च्या सरासरीने ६२० धावा केल्या. या कालावधीत राहुलने २ शतके आणि ४ अर्धशतके झळकावली आहेत. म्हणजेच राहुलने प्रत्येक डावात ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन…

गेल्या काही दिवसांपासून, दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भारताचा द. आफ्रिकेचा दौरा आठवडाभराने पुढे ढकलण्यात आला. १७ डिसेंबरपासून सुरू होणारी कसोटी मालिका आता २६ डिसेंबरपासून होणार आहे. त्यानंतर वनडे मालिका होईल. पण, बीसीसीआयने अजूनही वनडे संघाची घोषणा केली नाही. तर आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिकाही पुढे ढकलण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंसाठीही मोठा धोका आहे. दक्षिण आफ्रिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंना कोरोनाच्या नवीन प्रकाराचा धोका नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी बीसीसीआयला आश्वासन देत संपूर्ण संघासाठी सुरक्षित वातावरण तयार केले आहे, असे आश्वासनही दिले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news