weight loss tips : वजन कमी करायला मदत करतील ‘या’ सोप्या टिप्स

weight loss
weight loss
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  अनेकजण वाढत्या वजनामुळे हैराण असतात. ( weight loss tips ) वाढलेले वजन कमी कसे करायचे या चिंतेत असतात. वजन कमी करण्यासाठी व्यायाम, कमी खाणे असे अनेक प्रयोग केले जातात. कुणी एखादा सल्ला दिला तर तो लगेच अंमलात आणला जातो. मात्र, काही टिप्प अंमलात आणल्या तर वजन आपोआप आटोक्यात येऊ शकते.

उपाशी राहणे, किंवा कमी खाण्याने वजन कमी होईल अशी अनेकांची अपेक्षा असते. काही लोकांना हेल्दी डाएट प्लॅन करणे कठीण असते.

कधी कधी असे वाटायला लागते की हे डाएट प्लॅन आपण पाळत नाही म्हणून आपले वजन कमी होत नाही.

कधी कधी असेही होते की आपण वजन कमी करण्यासाठी फळे, भाज्या खातो, मात्र, त्यामुळे आपल्याला जास्त भूक लागू शकते.

पण सगळे डाएट प्लॅन असे असत नाहीत. कमी स्निग्ध आणि फायबरयुक्त धान्य आपले वजन वेगाने घटवते.

चला तर मग जाणून घेऊ वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी काय करता येईल…

१. रिफाइंड काब्रोहायड्रेड असलेले पदार्थ टाळा

तुम्हाला जर वजन कमी करायचे  ( weight loss tips )असेल तर सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या आहारातून साखर, काब्रोहायड्रेड पदार्थ बाजुला करा.

यामुळे तुमची भूक कमी होईल. शिवाय इन्सुलिनची पातळीही कमी होण्यास मदत होईल. परिणामी आपण कमी जेवल्याने वजन कमी होऊ शकते.

२. प्रोटीयुक्त आहार, भाज्यांचे सेवन करा

तुमच्या आहारात प्रोटिन्स देणारे पदार्थ, चीज, तंतूमय पदार्थ, पानाच्या हिरव्या भाज्यांचा भरपूर प्रमाणात समावेश करा.

दररोजच्या जेवणात अशा पदार्थांचा समावेश केल्यास भरपूर पोषक तत्वे मिळतील.

परिणामी कमी खाण्यात जास्त पोषक तत्वे मिळाल्याने वजन आटोक्यात येऊ शकते. ( weight loss tips )

३. दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम

दररोज व्यायाम गरजेचा आहे. किमान ३० मिनिटांचा व्यायाम तुमचे वजन आटोक्यात आणेल. त्यामुळे तुमची चयापचय क्रिया सुरळीत होईल. जर तुम्ही कमी कॅलरीचे जेवण घेऊनही वजन कमी होत नसेल तर व्यायामाशिवाय पर्याय नाही. दररोज नीट व्यायाम केल्यास वजन तर कमी होतेच, शिवाय स्नायू बळकट होतात. व्यायामामुळे गाढ झोप येते.

४. दररोज गाढ झोप महत्त्वाची

कमी, अपुरी आणि चंचल झोप तुमचे वजन वाढवते. दररोज किमान सात ते आठ तास गाढ झोप घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचा मेंदू ताजातवाना राहतो. अपुऱ्या झोपेमुळे वजन वाढते असे संशोधनातून पुढे आले आहे.

५. हळू हळू जेवा

जेवण पूर्ण चावून खाणे गरजेचे आहे. आपण अनेकदा लगबगीने जेवतो त्यावेळी जेवण पूर्ण चावले जात नाही. त्यामुळे वजन वाढू शकते. हळू हळू जेवल्यामुळे वजन कमी करणारे हार्मोन्स वाढत जातात. परिणामी तुमचे वजन कमी होऊ शकते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news