varun gandhi : ‘नथुराम गोडसे जिंदाबाद म्हणणारे लोक देशाची लाज काढत आहेत’ | पुढारी

varun gandhi : 'नथुराम गोडसे जिंदाबाद म्हणणारे लोक देशाची लाज काढत आहेत'

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

राष्ट्रपिता महात्मा यांना जयंती दिनी आज देशासह जगभरात नमन केले जात आहे. मात्र, याच दिवशी महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेवरून सोशल मीडियावर गोडसे जिंदाबाद ट्रेंड करत आहेत. या ट्रेंडवर भाजप खासदार वरुण गांधी (varun gandhi) यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. अशी लोक देशाची लाज काढत असल्याचा घणाघात त्यांनी ट्विट करून केला.

राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांच्या 152 व्या जयंतीनिमित्त वरुण गांधी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींची गोळ्या घालून हत्या केली होती.

बेजबाबदारपणे देशाला लाजवत आहेत

वरुण गांधी (varun gandhi) यांनी ट्विट केले की, ‘भारत नेहमीच आध्यात्मिक महासत्ता राहिला आहे, महात्मा यांनीच आपल्या अस्तित्वाद्वारे आपल्या देशाचा आध्यात्मिक पाया मांडला आणि आपल्याला नैतिक अधिकार दिला, जो आजही आपली सर्वात मोठी ताकद आहे. गोडसे जिंदाबादचे ट्वीट करणारे बेजबाबदारपणे देशाला लाजवत आहेत.

ट्विटरवर नथुराम गोडसे जिंदाबाद हॅशटॅगसह अनेक ट्विट केले जात आहेत. वरुण गांधींनी (varun gandhi) आपल्या ट्विटमध्ये हा हॅशटॅग वापरला नाही. वरूण गांधींच्या पोस्टवर 7 हजारांहून अधिक लाइक्स आल्या आहेत आणि बरीच रिट्विट्सही केली गेली आहेत. बापूंच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी, अमित शहा, सोनिया गांधी यांच्यापासून अनेक दिग्गज नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र श्रद्धांजली. पूज्य बापूंचे जीवन आणि आदर्श देशाच्या प्रत्येक पिढीला कर्तव्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देत राहतील.

ते म्हणाले की, ‘गांधी जयंती दिनी मी बापूंना नमन करतो. त्याची आदर्श तत्त्वे जगभरात प्रासंगिक आहेत आणि लाखो लोकांना बळकट करतात.

नंतर, पंतप्रधानांनी राजधानीतील राजघाट येथील बापूंच्या समाधी स्थळाला भेट देऊन पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजलीही वाहिली. या निमित्ताने तेथे सर्व धर्म प्रार्थना सभेचेही आयोजन करण्यात आले होते.

हे ही वाचलं का?

Back to top button