Onion Rate : कांदा विक्रीचा दर वाढूनही शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

Onion Rate : कांदा विक्रीचा दर वाढूनही शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
Published on
Updated on

[toggle title="लासलगाव ; पुढारी वृत्तसेवा" state="open"][/toggle]

चाळीसगाव, नांदगाव, मालेगाव या भागात गेल्या पंधरा दिवसांत मुसळधार पाऊस पडल्याने नवीन कांद्याचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर दक्षिणेकडील राज्यातही कांदा आवक मंदावल्याने नाशिकच्या कांद्याला मागणी वाढल्याने कांदा दराला कमाल ३१०१ रुपये प्रति क्विंटल दर (Onion Rate) मिळाला.

काल (दि.१) शुक्रवारच्या तुलनेत सरासरी कांदा दरात (onion rate) ५०० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून लासलगाव व परिसरात पावसाचा जोर वाढत असल्याने शेतात पाणी साचले आहे.

कांदा आवक का मंदावली? (Update on onion rate)

त्यामुळे कांदा आवक मंदावली आहे. पुढील सणासुदीचा काळ बघता कांदा भावात आणखी वाढ होईल अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहे.

पश्‍चिम बंगाल, दिल्लीच्या बाजारपेठेत दक्षिण भारतातून पाठविलेला कांदा पावसामुळे खराब झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

नाशिकच्या उन्हाळी कांद्याची मागणी वाढली

त्यातच पावसामुळे राजस्थान सह दक्षिणेकडील भागात कांद्याचे नुकसान झाल्याने नाशिकच्या उन्हाळ कांद्याला देशांतर्गत मागणी वाढली आहे. परिणामी, पाच दिवसांत कांद्याच्या भावाने क्विंटलला ११०० रुपयांनी उसळी घेतली.

येथील मुख्य बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमीत कमी १०००,सरासरी २९७० तर जास्तीत जास्त ३१०१ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाले.

परतीच्या पावसाने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे.आज कांद्याला भाव जरी असला तरी कांदा वजन आणि प्रतवारिला फटका बसला आहे. त्यामुळे भाव वाढीचा खुप काही फायदा होत आहे असे नाही.
– रामा भोसले, शेतकरी

हे ही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news