एकरकमी एफआरपी : कराडात बळीराजा शेतकरी संघटनेचे आंदोलन | पुढारी

एकरकमी एफआरपी : कराडात बळीराजा शेतकरी संघटनेचे आंदोलन

कराड; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारसह राज्य शासनाकडून शेतकर्‍यांना एकरकमी एफआरपी देण्याऐवजी तीन टप्प्यांत देण्याचा घाट घातला जात आहे. कोणत्याही परिस्थितीत एफआरपी चे तीन तुकडे होऊन देणार नाही, असा इशारा देत बळीराजा शेतकरी संघटनेकडून कराडमध्ये निदर्शने करण्यात आली.

यावेळी शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करण्याची मागणीही केंद्र सरकारकडे करण्यात आली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करत बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.

यावेळी विश्वास जाधव, उत्तमराव खबाले, प्रकाश पाटील, सागर कांबळे,पोपट जाधव, तात्या पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. राज्य शासनासह केंद्र सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हे ही वाचा :

Back to top button