खंबाटकी घाटात मेगाब्लॉक, वाहतूक कोंडीत अडकलेले वाहन चालक घामाघूम

खंबाटकी घाटात मेगाब्लॉक, वाहतूक कोंडीत अडकलेले वाहन चालक घामाघूम
Published on
Updated on

खंडाळा : पुढारी वृत्तसेवा

पुणे-बंगळूर महामार्गावर खंबाटकी घाटात दत्तमंदिरानजीक कंटेनर बंद पडल्याने गुरुवारी सकाळी मेगाब्लॉक झाला. वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीत अडकून पडल्यामुळे त्रस्त झालेल्या चालकांना उन्हाच्या वाढत्या चटक्याचा सामना करावा लागला. त्यामुळे वाहन चालक चांगलेच "गरम" झाले होते. अरुंद रस्त्यावरच लांबलचक कंटेनर बंद पडल्याने एकेरी वाहतूक सुरु होती.

महामर्गावरील खांबाटकी घाट रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. रुंदीकरणामुळे रस्त्यावर एकाच वेळी तीन ते चार वाहने जातात. मात्र दत्तमंदिराजवळ काही भाग रुंदीकरण करण्यात आला नाही. याच ठिकाणी कंटेनर (क्र . NL 01- A A – 6082) हा बंद पडला होता. त्यामुळे या ठिकाणाहून एकच वाहन पुढे जात असल्याने मागे वाहनांच्या रांगा लागल्या. काही वेळातच घाट रस्ता ठप्प झाला.

खंडाळा पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस प्रकाश फरांदे सहकार्‍यांसह घटनास्थळी पोहचले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत. बंद पडलेल्या कंटेनरजवळून एकच वाहन पुढे सरकत असल्यामुळे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news