प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा, ” सध्‍या तरी राजकीय पक्ष .. “ | पुढारी

प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा, " सध्‍या तरी राजकीय पक्ष .. "

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

सध्‍या तरी राजकीय पक्ष स्‍थापन करण्‍याचे नियोजन नाही;पण मी १७ हजार नागरिकांशी संवाद साधेन. यामध्‍ये स्‍वतंत्र पक्ष स्‍थापन करण्‍याबाबत निर्णय झाला तरच राजकीय पक्ष स्‍थापन केला जाईल, असे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी स्‍पष्‍ट केले. २ ऑक्‍टोबर २०२२ रोजी बिहारमध्‍ये ३ हजार किलोमीटर पदयात्रा काढली जाईल, अशी घोषणाही त्‍यांनी केली,

काही दिवसांपूर्वी एक ट्‍विट करत प्रशांत किशोर यांनी राजकीय पक्ष स्‍थापन करण्‍याचे संकेत दिले होते. यासंदर्भात आज त्‍यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्‍पष्‍ट केली. ते म्‍हणाले, ” बिहारमध्‍ये सध्‍या निवडणूक होणार नाही. त्‍यामुळे सध्‍या तरी स्‍वतंत्र राजकीय पक्ष स्‍थापन करण्‍याचे नियोजन नाही;पण मी १७ हजान नागरिकांशी संवाद साधेन. यामध्‍ये स्‍वतंत्र पक्ष स्‍थापन करण्‍याचा निर्णय झाला तरच पक्ष स्‍थापन केली जाईल. पुढील तीन ते चार वर्षांत मी माझी भूमिका बिहारमधील नागरिकांसमोर मांडेन. तसेच हा केवळ माझा पक्ष असणार नाही. जो कोणी या पक्षात योगदान येईल, त्‍याचा हा पक्ष असेल”.

बिहारमध्‍ये तीन हजार किलोमीटर पदयात्रा काढणार

राजकीय पक्ष स्‍थापन करण्‍यापूर्वी नागरिकांशी संवाद साधला जाईल. तसेच २ ऑक्‍टोबर २०२२ रोजी बिहारमध्‍ये ३ हजार किलोमीटर पदयात्रा काढली जाईल.

हेही वाचा : 

 

 

Back to top button