

पुढारी ऑनलाईन डेस्क : रूस्तमजी विकासकाचे सरकारमधील कोणत्या मंत्र्याशी लागेबंध आहेत, असा सवाल करत भाजप नेते आशिष शेलार यांनी वांद्रे येथील जागेच्या घोटाळ्याबाबत प्रश्न उपस्थित केले. मुंबई येथे आज पत्रकार परिषदेत ते बोलत हाेते.
महसूल खात्यांच्या ताब्यातील जागेची जागेची कवडीमोल दरात विक्री केली गेली. एक एकर जागा खासगी विकासकाच्या खिशात घातली, यामुळे विकसकाला १ हजार कोटींचा फायदा झाला. भाडेकरार संपुष्टात आल्यानंतर ही जागा सरकारने ताब्यात का घेतली नाही, असा सवाल शेलार यांनी केला.
भाडेपट्टी करार संपूष्टात आल्यानंतर या जागेला विकण्याची परवानगी देण्यात आली, हे संशयास्पद आहे. वर्ग २ पद्धतीने ही जागा विकली गेली असती तर सरकारला 380 कोटी रूपयांचा फायदा झाला असता. हे ज्यांनी कोणी केले आहे त्याचा शोध घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा
पाहा व्हिडीओ :