माझी पत्नी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात साम्य – देवेंद्र फडणवीस | पुढारी

माझी पत्नी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात साम्य - देवेंद्र फडणवीस

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे आणि माझ्या पत्नीत एक साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारणे सोडत नाहीत. माझी पत्नी नको त्या गोष्टीला उत्तर देणे सोडत नाही.

उद्धवजींनी मुख्यमंत्री म्हणून आपली पातळी वर ठेवली पाहिजे. कोणत्याही गोष्टीला माझ्या पत्नीने उत्तर देण्याचे टाळले पाहिजे. दोघांनी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे. अर्थात, हा त्या दोघांचा प्रश्‍न आहे, असा टोला फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
फडणवीस यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही यावेळी टीकास्त्र सोडले. मी 1857 च्या उठावात मागच्या जन्मात असेलही. तेव्हा मी झाशीची राणी आणि तात्या टोपेंसोबत लढलो असेल; पण तुम्ही त्यावेळीही इंग्रजांशी युती केली असेल, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

Back to top button