पुढारी ऑनलाईन डेस्क
रेल्वे भरती बाेर्ड( आरसीबी ) 'एनटीपीसी' परीक्षा निकालाविराेधात परीक्षार्थी बिहार, उत्तर प्रदेशमध्ये रस्त्यावर उतरले आहेत. या निकालात घाेटाळा झाल्याचा आराेप करत गया जिल्ह्यात परीक्षार्थींनी ट्रेनला आग लावण्यात आली. तर अनेक ठिकाणी रेल राेकाे आंदाेलन सुरुच ठेवले आहे.हिंसा अधिक भडकू नये यासाठी पाोाेलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. या प्रकरणात बुधवारी उशीरा रात्री पटणाच्या पत्रकार नगर स्थानकात कोचिंग संचालक आणि युट्युबर फैजल खान उर्फ खान सर सोबतचं काही कोचिंग क्लासेसच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सरांविषयी इंटरनेटवर सर्च केले जात आहे. जाणून घेवूया खान सरांविषयी…
फैजल खान यांच मूळ गाव उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील भाटपाररानी या कस्ब्यातील राहणारे आहेत. आहे. पटणामध्ये ते कोचिंग क्लास घेतात. ते युट्युबवरह क्लास घेण्यामुळे चर्चेत असतात. मूळ भाषेतील शैलीनुसार ते संवाद फैकी करतात. यामुळे तसेच त्यांच्या भाषणशैलीमुळे साेशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे.
खान सरांचे वडील भारतीय सैन्यात अधिकारी आहेत. सध्या निवृत्त झाले आहेत. मोठा भाऊही सैन्यात जवान आहे. घरातील व्यक्ती सैन्यात असल्याने खानसरानी देखील १२ वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर सैन्यात भरती होण्यासाठी नॅशनल डिफेंस ॲकॅडमीमध्ये जाण्यासाठी तयारी केली. याच्या लेखी परिक्षेत पास झाल्यानंतर मुलाखतीत सिलेक्शन होऊ शकले नाही.
एनडीए मध्ये सिलेक्शन होऊ न शकल्याने खान सरांनी कोचिंग क्लास घेण्यास सुरुवात केली. क्लास घेण्याच्या त्याच्या अनोख्या शैलीने ते कमी वेळातच प्रसिद्ध झाले. युट्युबवर क्लास घेण्याबरोबरच khan gs research centre या नावाने कोचिंग क्लास चालवतात. याशिवाय खान सरांनी सामान्य ज्ञान आणि विज्ञानाची काही पुस्तकेही लिहीली आहेत. काही पुस्तके उर्दु भाषेतही लिहीली आहेत.
खान सरांचं खर नाव काय यावरुनही मोठा वाद झाला होता. समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालेल्या व्हिडीओं मध्ये खान सर स्वत:चे नाव कधी अमित सिंह तर कधी इतर काही सांगत होते. पण वादानंतर त्यांनी आपल्या नावाबाबत खुलासा केला होता.
खान सर बिहार पंचायत निवडणूकीत विपिन सर या नावाने प्रसिद्ध युट्युबर आणि गणितचे शिक्षक यांच्यासाठी मत मागताना दिसले होते. प्रचारादरम्यान जनतेत त्यांची लोकप्रियता पाहिल्यानंतर त्यांनी राजकारणात येणार असल्याचे सांगितले होते. प्रचारदरम्यान पुढे आलेल्या खान सरांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. खान सरांच्या प्रचारामुळे विपिन निवडून आल्याचे बोलेले जाते.
२४ जानेवारीला पटनाच्या राजेंद्रनगर टर्मिनल्स येथे विद्यार्थांकडून गोंधळ करण्यात आला. या प्रकाणात ३०० ते ४०० अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपासात विद्यार्थी किशन कुमार, रोहीत कुमार , राजन कुमार आणि विक्रम कुमार यांना पुलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहेत.
. खान७ सर यांच्या शिवाय एसके झा सर, नवीन सर, अमरनाथ सर, गगन प्रताप सर, गोपाल वर्मा सर आणि बाजार सिमिती च्या विविध कोचिंग संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांविरोध भां.द.वी कलम १४८, १४९, १५१, १५२, १८६, १८७,१८८, ३३०, ३३२, ३५३, ५०४, ५०६ या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचलत का?