पुढारी ऑनलाईन डेस्क : मालेगाव महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. माजी आमदारासह तब्बल २७ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसला हा फार मोठा झटका मानला जातो आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.
राज्याच्या राजकारणात चर्चेत राहण्याच्या प्रयत्नातील काँग्रेसला मालेगाव शहरात खिंडार पडले आहे. पुत्र माजी आमदार आसिफ शेख यांच्यापाठोपाठ पिता माजी आमदार शेख रशीद, महापौर ताहेरा शेख यांच्यासह 2७ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.
काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी गतवर्षी ८ फेब्रुवारीला काँग्रेसला सोडचिट्टी दिली होती. तेव्हा त्यांचे वडिल माजी आमदार शेख रशीद यांनी या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त करत अनभिज्ञता दर्शविली होती. परंतु, त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यक्रमास सभागृहनेते असलम अन्सारी यांसह काँग्रेसींची उठबैस वाढली होती. दरम्यान, १३ ऑक्टोबरला शेख रशीद यांनी पक्षाच्या शहराध्यक्षपदासह इतर जबाबदार्यांमधून मुक्त होत असल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठविले होते. त्यानंतरही पक्षश्रेष्ठींकडून कोणत्याही प्रकारची मनधरणी झाली नाही.
पक्ष आणि शेख कुटुंबात संबंध ताणले गेल्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्य कार्यकारिणी सदस्य राजाराम पानगव्हाणे यांच्यासह इतर वरिष्ठांविषयी जाहिररित्या नाराजी व्यक्त करत पक्षांतराचे संकेत दिले होते.
दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.