Corona : सलग तिसऱ्या दिवशी तीन लाखांहून कमी रूग्‍ण  | पुढारी

Corona : सलग तिसऱ्या दिवशी तीन लाखांहून कमी रूग्‍ण 

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन :  देशात कोरोनाचा वेग कमी होताना दिसत आहे. आज पुन्हा तीन लाखांहून कमी कोरोना संसर्गाची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आज देशात कोरोनाचे 2,86,384 नवीन रुग्ण आढळले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 22,02,472 वर पोहोचली आहे.

सलग तिसऱ्या दिवशी तीन लाखांहून कमी रूग्‍ण

तसेच,सलग तिसऱ्या दिवशी कोरोना संसर्गाची तीन लाखांहून कमी रूग्‍ण संख्या नोंदवली आहे. 24 जानेवारी रोजी कोरोनाचे 2,55,874 नवीन रुग्ण आढळले. दुसऱ्या दिवशी 25 जानेवारी रोजी 2,85,914 नवीन प्रकरणांची नोंद झाली., दरम्‍यान गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,86,384 नवीन रुग्ण आढळले आहेत. तीन दिवसांपूर्वी 23 जानेवारी रोजी देशात कोरोनाचे 3,06,064 नवीन रुग्ण आढळले होते.

लसीकरणाचा आकडा 164 कोटी

कोरोना काळात देशात लसीकरणाचे काम वेगाने केले जात आहे. आतापर्यंत देशात लसीचे सुमारे 164 कोटी डोस देण्यात आले आहेत. ९३ कोटी लोकांना पहिला तर ६९.९५ कोटी लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. त्याच वेळी, आतापर्यंत 92 लाखांहून अधिक लोकांना लसीचे डोस मिळाले आहेत.

हे ही वाचलं का 

Back to top button