पुणे : राष्ट्रीय जलतरणपटूचा बॉक्सिंगमध्ये ‘सुवर्ण ठोसा’ | पुढारी

पुणे : राष्ट्रीय जलतरणपटूचा बॉक्सिंगमध्ये ‘सुवर्ण ठोसा’

सुनील जगताप

पुणे : क्रीडा क्षेत्रामध्ये मुलांना पाठविण्याचे धाडस अनेक पालक करताना दिसत नाहीत आणि जे खेळाडू क्रीडा क्षेत्रात येतात ते मध्येच खेळ सोडून देत असल्याचे चित्र आपल्याला दिसून येते. मात्र, एका 13 वर्षीय पुण्यातील चिमुकलीने जलतरणामध्ये खेळत असतानाच आता बॉक्सिंग खेळात ‘सुवर्ण ठोसा’ मारला आहे. अशा श्रावणी जयदीप निलवर्ण हिचा ‘राष्ट्रीय बालिका दिना’निमित्त दै. ‘पुढारी’ने घेतलेली विशेष मुलाखत…

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. अनिल अवचट यांचे निधन

पुण्यात राहणारी श्रावणी हिचे वडील जयदीप निलवर्ण हे बॉक्सरपटू असून, एका खासगी कंपनीत नोकरी करतात. त्याचबरोबर एमआयजीएस क्लब येथे बॉक्सिंगचे प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. मुक्तांगण शाळेमध्ये असताना वयाच्या नवव्या वर्षी ती प्रथम पाण्यात उतरली. घोरपडे पेठ येथील निळू फुले जलतरण तलावामध्ये प्रशिक्षक शेखर कारखानीस यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा जलतरणचा प्रवास सुरू झाला.

US Vs North Korea : उ. कोरियाकडून जपानच्या समुद्रात क्षेपणास्त्र चाचणी

श्रावणीने वयाच्या 10 व्या आणि 11 व्या वर्षी सलग दोन वर्षे तिवती व देवबाग संगम बीच ही समुद्रातील स्पर्धेत सहभागी होत पदकही मिळविले. आतापर्यंत तिने 19 सुवर्णपदके, 5 रौप्य, तर 2 कांस्यपदकांची कमाई केली आहे. जलतरणाबरोबरच एमआयजीएस क्लबमध्ये उमेश जगदाळे आणि शरद कंक यांच्या मार्गदर्शनाखाली बॉक्सिंगचे धडेही गिरवित असून, जिल्हास्तरीय बॉक्सिंगमध्ये प्रथमच उतरत सुवर्णपदकावर स्वतःचे नाव कोरले. श्रावणीचा खेळातील प्रवास पाहून तिचा सहा वर्षांचा भाऊ शिवांशही आतापासूनच व्यायामाला सुरुवात केली असून, त्याला बॉक्सिंग खेळात सहभाग व्हायचे आहे.

Stock Market : शेअर बाजारात हाहाकार, पाच मिनिटांत ३.८ लाख कोटींचा चुराडा, तर ७ सत्रांत २१ लाख कोटी बुडाले

याबाबत बोलताना श्रावणी म्हणाली की, जलतरण आणि बॉक्सिंग अशा दोन्ही खेळांमध्ये मला पदके मिळवायची असून, जलतरणाच्या माध्यमातून ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्याचे ध्येय आहे. माझ्या खेळामधील कष्टाला आई आणि वडिलांचा पाठिंबा कायम राहिला असून, त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे.

गोव्यातील कोलवाळ कारागृहात कैद्यांजवळ ७४ मोबाईल, ड्रग्ज सापडले

कझाकिस्तानची वारी हुकली

श्रावणी हिची कझाकिस्तान येथे बायथलॉन आणि ट्रायथलॉन या स्पर्धांसाठी भारतीय संघामध्ये निवड झाली होती. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत श्रावणीने नक्कीच पदक आणले असते. परंतु, आर्थिक परिस्थितीमुळे तिला या स्पर्धेत उतरताच आले नाही. अशा होतकरू खेळाडूला शासनाच्या क्रीडा विभाग तसेच सामाजिक संस्थांकडून आर्थिक सहकार्याची गरज आहे.

खेळाप्रती खूप मेहनत घेते…

श्रावणीची सकाळ ही पहाटे साडेपाच वाजता सुरू होते. सकाळचे धावणे, इतर व्यायाम, ऑनलाइन शाळा त्यानंतर दुपारी अभ्यास, संध्याकाळी सहा वाजता जलतरण सराव तर साडेसात वाजता बॉक्सिंगचा सराव करते. स्पर्धांमध्ये उतरल्यानंतर तिची जिद्द आणि चिकाटी खूप दिसून येते. सरावावेळीही केवळ खेळ आणि खेळ तिच्या डोळ्यांसमोर असतो. तिला कोणत्याही प्रकारचे प्रोटिन्स न देता घरगुती आहार, परंतु वेळेत देत असल्याने तिची ही कामगिरी दिसून येत आहे.                                                                                                                               – रेखा जयदीप निलवर्ण (श्रावणीची आई)

Back to top button