बधाई दो 11 फेब्रुवारीला येतोय | पुढारी

बधाई दो 11 फेब्रुवारीला येतोय

पुढारी ऑनलाईन

राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘बधाई दो’चा ट्रेलर समोर आला आहे. यात राजकुमारने पोलिसाची, तर लेस्बियन नात्याकडे झुकत असलेल्या मुलीची भूमिका भूमीने साकारल्याचे ट्रेलर दिसते. या दोघांचे लग्‍न ठरल्यावर होणारी धमाल चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची थीम सूक्ष्मपणे लव्हेंडर मॅरेज या संकल्पनेवर प्रकाश टाकते. चित्रपटात सीमा पाहवा, शीबा चड्ढा, लवलीन मिश्रा, नितीश पांडे, शशी भूषण यांच्याही भूमिका आहेत. हर्षवर्धन कुलकर्णी दिग्दर्शित हा चित्रपट 11 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. हर्षवर्धनने यापूर्वी ‘हंटर’ चित्रपट दिग्दर्शित केला होता.

Back to top button