गडचिराेली : भाजप नेते आनंद गण्यारपवार अपघातात ठार, कृउबा सभापती अतुल गण्यारपवार जखमी - पुढारी

गडचिराेली : भाजप नेते आनंद गण्यारपवार अपघातात ठार, कृउबा सभापती अतुल गण्यारपवार जखमी

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा: ट्रॅक्टरने कारला धडक दिल्याने चामोर्शी येथील भाजपचे जिल्हा सचिव आनंद गण्यारपवार हे जागीच ठार झाले. तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यारपवार हे जखमी झाले. आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावरील रणमोचन फाट्याजवळ आज शुक्रवारी (दि. २७) सकाळी ७ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

अतुल गण्यारपवार व आनंद गण्यारपवार हे चामोर्शी येथून ब्रम्हपुरीमार्गे क्रेटा कार (क्र.एमएच ३३ व्ही २४५) ने नागपूरला जात होते. दरम्यान रणमोचन फाट्याजवळ ट्रॅक्टरने कारला जोरदार धडक दिली. यात कारमध्ये मागे बसलेले आनंद गण्यारपवार हे जागीच ठार झाले, तर अतुल गण्यारपवार व चालक हे एअरबॅगमुळे बचावले.

घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव कृपाल मेश्राम यांनी अतुल गण्यारपवार यांना ब्रम्हपुरी येथील सर्वोदय रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या मानेला दुखापत झाली. दरम्यान खा. अशोक नेते यांनी ब्रम्हपुरी येथे जाऊन घटनेची माहिती घेतली.

हेही वाचलंत का? 

Back to top button