Bigg Boss OTT Finale : शिल्पाचं आवाहन, शमिता शेट्टीला विनर करा

shamita shetty
shamita shetty

पुढारी ऑनलाईन : आज १८ डिसेंबर रोजी Bigg Boss OTT finale (बिग बॉस ओटीटी) आहे. दरम्यान, शिल्पा शेट्टीने बहीण शमिता शेट्टीला विनर करण्यासाठी फॅन्सकडे वोट मागितले आहेत. शमिता शेट्टीला वोट कसं करायचं, हेदेखील तिने सांगितलं आहे.
शिल्पा शेट्टी खूप उत्सुक आहे. आणि नर्वसदेखील आहे. तिची बहिण टॉप-५ मध्ये आहे. त्यामुळे शिल्पाला तिचा अभिमान आहे. आता तिने तिच्या बहिणीला वोट द्यावे असे आवाहन फॅन्सकडे केले आहेत.

शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 'बिग बॉस ओटीटी'ची एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. यामध्ये शमिताचा बिग बॉसमधील सुंदर प्रवास दाखवण्यात आलाय.

व्हिडिओसोबत शिल्पाने कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'माझी टुंकी टॉप-५ मध्ये आहे. मला तिचा अभिमान आहे. बिग बॉसच्या या प्रवासात तिची माणुसकी आणि खरेपाणा पाहून मला खूप आनंद झालाय. तिने माझं मन जिंकलंय. माझ्यासाठी तू आधीचं विजेती झाली आहेस.'

शमिताने पुढे लिहिलंय, 'अपेक्षा करते की, आपण सर्वजण तिला 'बिग बॉस'ची विजेती कराल. चला मग, हे सत्य करून दाखवू. माझ्या इन्स्टा स्टोरीजवर जाऊन शमितासाठी वोट करा.'

बिग बॉसच्या पहिल्या दिवसापासून चर्चेत

शमिता शेट्टी बिग बॉसच्या पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. शोमध्ये राकेश बापटसोबत तिच्या लव्ह अँगलने खूप चर्चा झाली. दिव्या अग्रवालसोबत तिचे भांडणदेखील झाले होते.

बिग बॉस ८ ऑगस्टला सुरू झाले होते. आता आज १८ सप्टेंबर रोजी फिनाले असणार आहे. करण जोहर हा शो होस्ट करत आहे. या शोमध्ये टॉप-५ कंटेस्टेंट्सच्या यादीत शिल्पाची बहिण आहे. यादीत राकेश बापट, प्रतीक सहजपाल, निशांत भट्ट्, दिव्या अग्रवालचे नाव आगे.

यो शो च्या विनरची घोषणा जेनेलिया आणि रितेश देशमुख करतील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news