रकुलप्रीत सिंहचा 'डॉक्टर जी'मधील फर्स्ट लूक आला समोर | पुढारी

रकुलप्रीत सिंहचा 'डॉक्टर जी'मधील फर्स्ट लूक आला समोर

मुंबई; पुढारी ऑनलाईन : रकुलप्रीत सिंह पहिल्यांदा आयुष्मान खुरानासोबत दिसणार आहे. जंगली पिक्चर्सच्या कॅम्पस कॉमेडी ड्रामा ‘डॉक्टर जी’मध्ये स्क्रीन शेअर करताना रकुलप्रीत दिसणार आहे. यामध्ये शेफाली शाहदेखील मुख्य भूमिकेत आहेत.
निर्मात्यांनी नुकताच चित्रपटातील रकुलचा बहुप्रतीक्षित ‘फर्स्ट लूक’चे अनावरण केले.

Rakul Preet Singh
Rakul Preet Singh

बहुमजली पीक पद्धत : कशी घ्यायची बहुमजली पीकं?

माझ्या नवऱ्याची बायको : रुचिरा हिच्या सेक्सी अदा आणि…

‘डॉक्टर जी’ या चित्रपटातील डॉक्टर फातिमाची व्यक्तिरेखा सहजपणे वटण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. अनुभूती कश्यप यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. रकुलला यासाठी मेडिकल टर्मोनोलॉजी आणि काही महत्वपूर्ण सर्जिकल प्रक्रियांबाबतच्या डेटेलिंग्जचा देखील अभ्यास करावा लागला.

ब्रेकपॉईंट: लिएंडर पेस आणि महेश भूपतीचे आकर्षक पोस्टर रिलीज

‘जीव माझा गुंतला’ ; शुभ मुहूर्तावर येणार नव्या नात्याला आकार नियतीच्या खेळीने होणार का अंतराचा मल्हार ?

ऑपरेशन्स आणि इतर वैद्यकीय जगाशी जोडलेल्या प्रत्येक गोष्टींची तिने माहिती घेतली. निर्मात्यांनी तिला, आयुष्मान, आणि शेफाली यांना खास सेशन्सदेखील दाखवले. आपल्या व्यक्तीरेखेच्या तयारीचा भाग म्हणून प्रशिक्षित करण्यासाठी तज्ज्ञांसोबत खास सेशन्स आयोजित करण्यात आली होती.

‘जीव माझा गुंतला’ ; शुभ मुहूर्तावर येणार नव्या नात्याला आकार नियतीच्या खेळीने होणार का अंतराचा मल्हार ?

रंग माझा वेगळा : दीपाच्या संसारात बिब्बा घालणारी आयेशा आहे तरी कोण?

रकुल म्हणते-

रकुल म्हणाली, ‘डॉक्टर जी’चे चित्रीकरण हा एक सुंदर अनुभव राहिला आहे. यामध्ये मी एका डॉक्टरची भूमिका साकारत आहे. त्यामुळे यातील व्यवहार आणि काम परफेक्ट असणे आवश्यक होते.

स्क्रीनवर वास्तविक दिसण्यासाठी मेडिकलशी निगडित मुख्य गोष्टी जाणून घेणे अनिवार्य होते. डॉक्टर फातिमा बनण्याचा प्रवास ही एक अद्भुत प्रक्रिया होती. जी मी नेहमीच माझ्याजवळ जपून ठेवू इच्छिते.

आम्हाला फातिमाचे वास्तविक दिसणे आवश्यक वाटत होते. योग्य लुकसाठी आम्ही अनेक लुक टेस्ट केल्या. त्यामागे विचार हा होता की, हे यथासंभव वास्तविकतेच्या जवळ जायला हवे. व्यक्तिरेखेतील मृदुता समोर आणेल.

केवळ डॉक्टरचा ॲपरन घालून तुम्हाला अचानक जबाबदारीची जाणीव होऊन जाते. भलेही मी केवळ एक व्यक्तिरेखा साकारत होते. सीन्ससाठी रुग्ण तपासताना, कोणालाही हे सहज समजून येते. वास्तवात डॉक्टरांच्या खांद्यावर किती जबाबदारी असते. त्यांचे जीवन किती कसोटीपूर्ण असते.

‘डॉक्टर जी’ एक कॅम्पस कॉमेडी ड्रामा आहे. त्याचे सह-लेखक सुमित सक्सेना, विशाल वाघ आणि सौरभ भारत आहेत. निर्मात्यांनी नुकतेच प्रयागराजमध्ये एक व्यापक शूटिंग शेड्यूल पूर्ण केले. हा चित्रपट या महिन्याच्या शेवटापर्यंत पूर्ण होणार आहे.

नवरी नटली! देवमाणूसच्या अस्मिता देशमुख हिचा नवा लूक पाहून चाहते थक्क

‘ऐसा वैसा प्यार’: अदा शर्माच्या भावनिक अभिनयाने सेटवरील सर्वजण भावूक!

महेश कोठारे यांनी मागितली जाहीर माफी; काय आहे कारण?

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

Back to top button