नाशिक जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर; कांदा खरेदीबाबत एनसीसीएफ- नाफेडची करणार चौकशी

नाशिक जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर; कांदा खरेदीबाबत एनसीसीएफ- नाफेडची करणार चौकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

एनसीसीएफ आणि नाफेडने कांदा खरेदी करताना घोळ केला असल्याच्या तक्रारी शेतकरी व्यापारी यांनी जिल्हाधिकाऱी जलज शर्मा यांच्याकडे मांडल्या आहेत. याची तत्काळ दखल घेत जिल्हाधिकाऱी जलज शर्मा यांनी नाफेड आणि एनसीसीएफची चौकशी करणार असल्याचे समोर आले आहे.

संबधित बातम्या :

नाफेड, एनसीसीएफ या संस्थांनी किती कांदा खरेदी केला, कोणाकडून खरेदी केला, त्याला किती दर दिला, अशा सर्वच बाबींची तपासणी केली जाईल. त्यासाठी संबधित तहसीलदारांना आदेश देत तत्काळ हा विषय निकाली काढला जाईल, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले. कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क आकारल्याने झपाट्याने दर पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी या विरोधात नाशिकमध्ये रान उठविले. अशातच केंद्राने २४०० रुपये मुल्य ठरवून दिल्यानंतर नाफेड आणि एनसीसीएफ यांनी आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करताना कांदा खरेदीत चालबाजी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यात मुख्यत्वे करून व्यापाऱ्यांकडूनच कांदा खरेदी केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आल्यानंतरही त्यात सुधारणाच झाली नाही. त्यामुळे आता जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नाफेड आणि एनसीसीएफ या दोन्ही संस्थांच्या खरेदीची चौकशी करण्याचे सूतोवाच करताना तहसीलदारांनाही तत्काळ आदेश देण्यात येतील, असेे सांगितले.

नाशिकमध्ये गेल्या बुधवारपासून बाजार समितीत कांद्याच्या लिलावात बहुतांश व्यापाऱ्यांनी भाग घेतलेलाच नाही. अशावेळी नाफेड आणि एनसीसीएफने शेतकऱ्यांचा कांदा सरकारने निश्चित केलेल्या किमान आधारभूत मुल्यानुसार अर्थात प्रतिक्विंटल २४०० रुपयांनीच खरेदी करणे आवश्यक आहे. पण असे असताना एनसीसीएफने आपली खरेदी केंद्र नेमकी कुठे आहेत, याबाबत अपेक्षित प्रसिध्दी केलीच नाही. तर नाफेडने प्रसिध्दी केली असली तरीही प्रत्यक्षात स्थानिकस्तरावर त्याचे विशेष परिणाम दिसत नसल्याची तक्रार शेतकरी संघटनांकडून होत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news