कल्याण : राहत्या घरात आढळला लोको पायलटचा मृतदेह; संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ | पुढारी

कल्याण : राहत्या घरात आढळला लोको पायलटचा मृतदेह; संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : डिझेल लोको शेडमध्ये टेक्निशियन पदावर काम करणाऱ्या विनोद कुमार मीना (वय ३२) यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी रेल्वे कॉलनील्या बिल्डिंग क्रमांक ९७८ येथील रूममध्ये शुक्रवारी (दि.२२) सकाळी आढळून आला.

रूममध्ये विनोद कुमार मीना यांचा मृतदेह बेडखाली आढळून आला. तर घरातील सामानही अस्ताव्यस्त विखुरलेले आढळून आले. त्यामुळे या विनोद यांची हत्या करण्यात आली? की लुटीच्या उद्देशाने त्याला ठार मारण्यात आले? आदी प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. विनोद यांच्या संशयास्पद मृत्यूचा कोळसेवाडी पोलिसांनी चौकस तपास सुरू केला आहे.

या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोको पायलट विनोद कुमार हे रूममध्ये सद्या एकटाच राहत होते. त्यांचे कुटुंबीय राजस्थानमध्ये राहतात. गेल्या दोन दिवसांपासून विनोद यांचे नातेवाईक त्यांच्याशी बोलण्याकरिता फोनवर संपर्क साधत होते. मात्र, फोन उचलत नसल्याने विनोदच्या नातेवाईकांनी त्याच्या संपर्कात असलेल्या एका रेल्वे कर्मचाऱ्याला घरी जाऊन पाहण्यास सांगितले.

हा कर्मचारी विनोद यांना पाहण्यासाठी त्यांच्या घरी गेला. मात्र दाराची कडी आतून बंद होती. वारंवार बेल वाजूनही दार कुणी उघडत नसल्याने कर्मचाऱ्याला संशय आला. त्यांनी या संदर्भात विनोदच्या नातेवाईकांसह स्थानिक पोलिसांना माहिती दिली. ही माहिती कळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सदर घराचा दरवाजा उघडला.

आत जाऊन पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. तर विनोद हा त्याच्या बेडखाली मृतावस्थेत पडलेला दिसून आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून विनोद यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवून दिला.

उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर विनोद यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे. विनोदा यांचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. लोको पायलट विनोद यांच्या संशयास्पद मृत्यूचा विविध दृष्टिकोनातून पोलिसांनी चौकस तपास सुरू केला आहे.

हेही वाचा :

Back to top button