रायगड : सरखेल कान्होजीराजे आंग्रे घराण्याची ३०० वर्षांची परंपरा

रायगड
रायगड
Published on
Updated on

रायगड, पुढारी वृत्तसेवा : आंग्रे घराण्याच्या ३०० वर्षांच्या परंपरेतील गौरी पुजन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. मी माझ्या पूर्वकर्मांची पूण्याई मानतो अशी भावना सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघूजीराजे आंग्रे यांनी 'दैनिक पुढारी'शी बोलताना व्यक्‍त केली आहे.  सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या जन्मापूर्वी पासून या घराण्यात सुरु असलेल्या गौरी परंपरेस यंदा तब्बल ३०० वर्ष पूर्ण होत असल्याने रघुजीराजे आंग्रे यांच्या येथील घेरीया या निवासस्थानी गौरींची पारंपरिक प्रथेनूसार विधीवत पूजा करण्यात आली.

रघूजीराजे आंग्रे पूढे म्हणाले, गौरी पूजनाची ही पंरपरा गेली ३०० वर्ष अव्याहत सुरु आहे. सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या जन्मापूर्वी त्यावेळच्या संकपाळ आणि तद्नंतर आंग्रे घराण्याच्या या परंपरेचे आमच्या नऊ पिढ्यांपासून पालन करण्यात येत आहे. पूर्णपणे पारंपरिक पद्दतीनेच गौरी आवाहन, पुजन आणि विसर्जन असा हा सोहोळा करण्यात येतो. यांतून आपल्या पूवर्र्परंपरांना जागण्याचे आणि त्या अबाधीत राखण्याचा आमचा हा प्रयत्न असल्याचे रघुजीराजे आंग्रे यांनी पूढे सांगीतले.

अरबी समुद्रावर आपल्या पराक्रमाने अनन्यसाधारण दरारा निर्माण केलेले मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनीच17 व्या शतकाच्या अखेरीस अलिबाग या गावाची स्थापना केली आणि त्यामुळे त्यांनी सूरु केलेल्या विविध प्राचीन परंपरा आजही अलिबागच नव्हे तर संपूर्ण कोकण किनारपट्टीत अखंड सुरु आहेत. मराठा आरमाराची स्थापना करणारे सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढून मराठा आरमाराचा भगवा समुद्रात फडकवत ठेवला. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती.

भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे ताब्यात ठेवून आपला व्यापारी माल युरोपमध्ये पाठवण्यासाठी त्यांचा वापर करण्याची त्यांना आवश्यकता वाटत होती. सागरी व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी सागरी किल्ले काबीज करणेही आवश्यक होते. कान्होजींनी या गोंधळाचा उपयोग आपले आरमार स्थापन करण्यापासून ते संपूर्ण किनारपट्टीवर अनिर्बंध सत्ता गाजवेपर्यंत केला. इंग्रज आणि पोर्तुगीज आरमाराच्या अथक प्रयत्नानंतरही, त्यांच्या मृत्यू पर्यंत कान्होजी आंग्रे यांचे मराठा आरमार अजिंक्य राहिले.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news