लिलाव बंदच्या भूमिकेवर कांदा व्यापारी ठाम; २६ तारखेला मंत्र्यांबरोबर बैठक | पुढारी

लिलाव बंदच्या भूमिकेवर कांदा व्यापारी ठाम; २६ तारखेला मंत्र्यांबरोबर बैठक

येवला; पुढारी वृत्तसेवा : नाफेड कडून मार्केटमध्ये चुकीची पद्धत वापरून भाव पाडले जातात त्यामुळे व्यापाऱ्यांना मार्केटमध्ये काम करणे अशक्य झाले आहे. नाफेडला जर ग्राहकांना कमी भावात कांदा खाऊ घालायचा असेल तर त्यांनी रेशनिंग आणि खुल्या बाजारात द्यावा किंवा स्टॉल लावून ग्राहकांना कांदा द्यावा. मात्र, आम्ही जिथे कांदा पाठवतो तेथे नाफेडकडून कांदा पाठवून मार्केटमध्ये कांद्याचे भाव पाडले जातात. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघांचीही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचा या बैठकीत सूर निघाला.

दरम्यान दि.२६ तारखेला पणन मंत्री यांच्याबरोबर कांदा व्यापारी यांची बैठक असून त्या बैठकीत जर व्यापारी वर्गाचे मुद्दे लक्षात घेऊन योग्य तोडगा निघाला तर मार्केट पुन्हा चालू होईल. अन्यथा मार्केट बंद ठेवावे लागणार असे येवल्यातील जेष्ठ कांदा व्यापारी नंदकुमार अट्टल यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.

कर्नाटक मध्ये स्थानिक राज्य सरकारने प्रयत्न करून कर्नाटकमध्ये उत्पादक होणाऱ्या कांदा मालावर कोणत्याही प्रकारचे निर्यात शुल्क वगैरे आकारले जाणार नाही. असा निर्णय शेतकरी आणि व्यापारी यांच्या एकत्र बैठकीत घेतल्याचेही अट्टल म्हणाले. येवला अंदरसुल कांदा व्यापारी असोसिएशननी ही बैठक आयोजित केली होती.

यावेळी सोहन भंडारी , नंदू डागा, नितीन जैन, खंडू देवरे, विजय हेडा , विजय बाफना, आप्पासाहेब सांगळे , ऋषी सांगळे ,रोहिदास तांबे आदींसह नाशिक नगर धुळे वैजापूरयेथील व्यापारी या बैठकीत सहभागी झाले होते.

हेही वाचा :

Back to top button