ममता बॅनर्जी यांचा ३० नोव्हेंबरला महाराष्ट्र दौरा; ‘या’ नेत्यांशी हाेणार खलबते

ममता बॅनर्जी यांचा ३० नोव्हेंबरला महाराष्ट्र दौरा; ‘या’ नेत्यांशी हाेणार खलबते

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत खलबते केल्यानंतर आता महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी ते चर्चा करणार आहेत. ३० नोव्हेंबर रोजी त्या मुंबईत येणार आहेत.

दोन दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी बीएसएफच्या कार्यक्षेत्राबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. ममता बॅनर्जी या प्रखर मोदीविरोधक मानल्या जातात. सध्या त्या देशभरातील मोदीविरोधकांची मोट बांधत आहेत.

त्यांनी दिल्ली दौऱ्यात काँग्रेसमधील काही नाराज नेत्यांची भेट घेत तृणमूलमध्ये आणले आहे. ममत बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचीही भेट घेतली. स्वामी हे नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असतात. त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जाते. दिल्लीस्थित साऊथ एव्हेन्यूमध्ये जवळपास २०-२५ मिनिटांची भेट झाली.

यानंतर ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशातील वाराणसीचाही दौरा करणार आहेत. आमागी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना मदत करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
३० नोव्हेंबर रोजी त्या मुंबई दौऱ्यावर येणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी त्या चर्चा करणार आहेत. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यशीही त्या चर्चा करणार आहेत.

तृणमूल काँग्रेसचा मेगा इनकमिंग कार्यक्रम जोरात

ममता बॅनर्जी यांचे हे वक्तव्य तृणमूल काँग्रेसने मोठ्या प्रमाणावर इतर पक्षातून सुरु केलेल्या इनकमिंगच्या पार्श्वभूमीवर आले आहे. यात मोठ्या संख्येने काँग्रेसमधील आमदार आणि नेत्यांचा समावेश आहे. नुकतेच मेघालय मधील १२ आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये सामिल झाले आहेत. याचबरोबर गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईजिन्हो फ्लेरियो, दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सुपूत्र अभिजीत मुखर्जी यांनी देखील तृणमूल काँग्रेसचा झेंडा हातात घेतला आहे.

यापूर्वी ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी यांच्यातील ट्युनिंग चांगले असल्याचे दिसून आले आहे. मात्र पुढच्या पिढीत हे ट्युनिंग अजून पर्यंत दिसून आलेले नाही. बंगालमधील काँग्रेस नेते आणि बॅनर्जी यांच्यातील नाते फारसचे चांगले नाही. त्यामुळे काँग्रेस आणि तृणमूल यांच्यातील दरी अधिक वाढत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news