पिंपळनेर-सटाणा रस्‍त्‍यावर ट्रकची दुचाकीला धडक; सख्‍ख्‍या भावांचा मृत्‍यू | पुढारी

पिंपळनेर-सटाणा रस्‍त्‍यावर ट्रकची दुचाकीला धडक; सख्‍ख्‍या भावांचा मृत्‍यू

पिंपळनेर ; पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर-सटाणा रस्‍त्‍यावर अपघातात सख्‍ख्‍या भावांचा मृत्‍यू झाला.  मृत दोघे भाऊ ऊस तोडणीसाठी जात होते. पिंपळनेर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. मृतांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती कळताच रुग्णालयात धाव घेत एकच आक्रोश केला.

साक्री तालुक्यातील मलांजन येथील दोन युवक बारामती (पुणे) येथे मोटर सायकलने ऊस तोडणीसाठी जात होते. पिंपळनेर- सटाणा रस्त्यावरील सटाणाकडे ऊसाचा ट्रक ( एम.एच ०४ बी.जी ५६८६)  चालला होता. या भरधाव ट्रकने मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात सख्‍खे भाऊ अशोर व संजय यांच्या जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची  माहिती मिळताच पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक व्ही.बी. माळचे, प्रवीण अमृतकर, निलेश महाजन, ग्यानसिंग पावरा, भूषण वाघ यांच्यासह इतर पोलिस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळावरून ट्रक चालक ट्रक सोडून फरार झाला असून अनिल बापू सोनवणे यांनी  दिलेल्या माहितीनुसार पिंपळनेर पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलं का?

Back to top button