ललित मोदी-सुष्मिता यांच्या डेटिंगवर एक्स बॉयफ्रेंड म्हणाला,”तिने त्याला निवडलं असेल…”

Sushmita Sen Rohman Shawl
Sushmita Sen Rohman Shawl

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सुष्मिता सेन ललित मोदीसोबत नव्या नात्याची सुरुवात केली आहे. ललित मोदीने सोशल मीडियावर आपल्या रिलेशनशीपचा खुलासा करताच लोकांकडून भरभरून कमेंट्स येत आहेत. अनेकांना सुष्मिता आणि ललित मोदी यांची जोडी आवडलेली नाही. अनेक लोक अभिनेत्री सुष्मिताने उचललेल्या पावलाचे कौतुक केले जात आहे. खूपसे लोक वायफळ चर्चा करत आहेत. तर सुष्मिता फॅन्सचं मन तुटलं आहे.

या सर्व प्रकारादरम्यान सुष्मिता सेनचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलची प्रतिक्रिया आलीय. त्याच्या म्हणण्यावरून असं वाटतयं की, रोहमनला हे पाहून अजिबात दु:ख झालेल नाही. तो आनंदी आहे की, सुष्मिताला तिच्या क्षमतेचा जोडीदार मिळाला आहे.

ललित मोदीने गुरुवारी सायंकाळी सुष्मिता सेनचा फोटो अपलोड करून सोशल मीडियावर आपलं प्रेम व्यक्त केलं होतं. लोकांना वाटलं की, दोघांनी लग्न केलं आहे, पण, नंतर स्पष्ट झालं की, आता फक्त आम्ही एकमेकांना डेट करत आहोत. यानंतर शुक्रवारी यावर सुष्मिता सेनचीदेखील प्रतिक्रिया आली. आता सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलचीदेखील प्रतिक्रिया आलीय. सुष्मिताच्या एक्स बॉयफ्रेंड रोहमनसाठी हे कुठलेही धक्कादायक वृत्त नाही.

एका मुलाखतीदरम्यान रोहमनने म्हटलं की, प्रेम सुंदर आहे. यासाठी त्यांना आनंदी राहू द्या. मला इतकचं माहिती आहे की, जर तिने त्याला निवडलं असेल तर तो तिच्या लायक आहे. याशिवाय रोहमनने आपल्या स्टोरीवर लिहिलंय- कुणाच्या हसण्याने समाधान मिळत असेल तर हसून घ्या. कारण, चिंतेत ते नाहीत तर तुम्ही आहात.

रोहमन शॉल आणि सुष्मिता सेनने मागील वर्षी ब्रेकअप केलं होतं. दोघे एकमेकांना २०१८ पासून डेट करत होते. रोहमन सुष्मितापेक्षा १६ वर्षांनी लहान आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news