पिंपरी : पोस्टमनकडून अपघात विमा चक्क घरपोच! | पुढारी

पिंपरी : पोस्टमनकडून अपघात विमा चक्क घरपोच!

नंदुकमार सातुर्डेकर :  पिंपरी : इंडिया पोस्ट पेमेन्ट्स बँक आणि टाटा यांच्या सहकार्य करारातून ग्राहकांना वर्षाला अवघे 399 रुपये प्रीमियममध्ये 10 लाखांचा अपघात विमा योजना सुरू झाली आहे. पोस्टमन घरपोच अपघात विमासेवा देणार आहेत. शहरामधील 32 पोस्ट कार्यालयातून गेल्या दहा दिवसांत 150 पॉलिसी विकल्या गेल्या आहेत.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या खातेदारांसाठी ही योजना आहे. ही मूळची टाटाची योजना असून पोस्टाच्या माध्यमातून ही पॉलिसी विकली जात आहे. त्यासाठी पोस्टाने टाटा कंपनीबरोबर करार केला आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते काढणे पॉलिसीबाबत ग्राहकांना समजावून सांगून पॉलिसी विक्री करणे, क्लेमबाबत सेवा देणे या सेवा पोस्ट पुरवणार आहे अतिशय कमी प्रीमियममध्ये टाटाने ही पॉलिसी देऊ केली आहे. एक वर्षासाठी 399 रुपये भरून दहा लाखाचा विमा ग्राहकांना देऊ केला आहे. दरवर्षी हा विम्याचे नूतनीकरण करून त्याचा लाभ घेता येतो.

अपघाती मृत्यू – 10 लाख रुपये
कायमचे अपंगत्व – 10 लाख रुपये
दवाखाना खर्च – 60 हजार रुपये
मुलांचा शिक्षण खर्च – 1 लाख रुपयांपर्यंत रुग्णालयात अ‍ॅडमिट असेपर्यंत दररोज 1000 रुपये (10 दिवस)
ओपीडी खर्च 30,000 रुपये
अपघाताने अर्धांगवायू आजाराचा त्रास झाल्यास 10 लाख रुपये
कुटुंबासाठी दवाखाना प्रवासखर्च 25000 रुपये
वय : 18 ते 65 सर्वांना 399 रुपये वार्षिक हप्ता
सर्व प्रकारच्या अपघातांचा या विमा सेवेमध्ये अंतर्भाव असेल

ही टाटाची योजना असून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत पॉलिसीची विक्री केली जात आहे.त्यासाठी पोस्ट पेमेंट बँकेत खाते काढणे, पॉलिसी विक्री करणे, विक्रीपश्चात सेवा देणे ही कामे पोस्ट खात्याकडून केली जात आहे. कमी प्रीमियममध्ये अधिक लाभ देणारी ही अपघात विमा योजना असून गेल्या दहा दिवसात पिंपरी- चिंचवडमधील 32 पोस्ट कार्यालयातून सुमारे दीडशे पॉलिसीची विक्री झाली आहे. पॉलिसी पोस्टमनद्वारेही विकली जाते. घरपोच सेवा दिली जात आहे.
-के. एस. पारखी,
जनसंपर्क अधिकारी, पोस्ट खाते

Back to top button