पिंपरी : विनयभंग प्रकरणी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल | पुढारी

पिंपरी : विनयभंग प्रकरणी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  महिलेच्या पतीला अश्लील मेसेज करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार जानेवारी 2021 ते 14 जुलै 2022 या कालावधीत श्रीधरनगर, चिंचवड येथे घडला. याप्रकरणी पीडित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने सोशल मीडियावर आपण एका शाळेचा विद्यार्थी असल्याचे सांगून फिर्यादी महिलेशी जवळीक केली. फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांची माहिती चोरून फिर्यादी यांचा पाठलाग केला. तसेच, फिर्यादी बाबत त्यांच्या पतीला अश्लील मेसेज केले. त्यानंतर महिलेचे आपल्याशी शारीरिक संबंध असल्याचे सांगून मित्र आणि कुटुंबियांमध्ये बदनामी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button