Karan Mehra: निशा रावलविरोधात साक्षीदार बनली कश्मिरा शाह

karan mehra -nisha rawal
karan mehra -nisha rawal

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकप्रिय टीव्ही अभिनेता करण मेहरा याची नैतिक ही व्यक्तिरेखा प्रचंड गाजली. या भूमिकेने घरोघरी आपली छाप सोडली. पण त्याच्या कौटुंबिक वादामुळे तो चर्चेत आहे. त्याचे आणि पत्नी निशा रावल (Karan Mehra) यांच्यात सध्या जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी, अभिनेता करण मेहराने पत्रकार परिषद घेऊन अभिनेत्री निशा रावलवर अनेक गंभीर आरोप केले होते. रोहित सेठियासोबतचे तिचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचा आरोप त्याने केला होतो. आता यानंतर कश्मीरा शाहनेही काही खुलासे केले आहेत. करणने कश्मीरा शाहचे आभार मानले आहेत. (Karan Mehra)

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कश्मिरा शाहने सांगितले की, निशाचा तिला कॉल आला होता की, काहीच ठीक नाहीये; मग काही दिवसांनी रोहित वर्माचा रात्री साडेबारा वाजता कॉल आला की, करणने निशाला मारहाण केलीय. कश्मीराच्या माहितीनुसार, करण डासदेखील मारत नाही. मग तो असं कसं करू शकतो. मग, करणने कश्मीराला या प्रकरमात साक्षीदार होण्यास सांगितले.

करण मेहराने कश्मिरा शाहचे आभार मानले

कश्मिराने करणची साक्षीदार होण्यासाठी होकार दिला. त्यानंतर करणने सोशल मीडियावर तिचे आभार मानले आहेत. तिने लिहिले, 'तुमचे आभार कसे मानावेत, हे माझ्याकडे शब्द नाहीत. तुम्ही माझ्या आणि माझ्या कुटुंबासोबत उभे आहात. यासाठी मी सदैव ऋणी आणि ऋणी राहीन.' यासोबतच तिने कश्मिराच्या त्या मुलाखतीची एक क्लिपही पोस्ट केली. ज्यामध्ये तिने निशाबद्दल बरेच काही सांगितले आहे.

कश्मीरा शाहचा निशा रावलला टोमणा

करण मेहरा कधीही हिंसक होऊ शकत नाही, असे कश्मिरा शाहने सांगितले होते. अभिनेत्याने तिला पाठिंबा देण्यास सांगितले होते, म्हणून तिने तिला पाठिंबा देण्याचे मान्य केले आहे. त्याचवेळी अभिनेत्रीने निशा रावलची खिल्ली उडवली. ती म्हणाली की, निशा अभिनेत्री नसती तर तिने वकिली केली असती. कारण तिने लॉक अप शोमध्ये तिची कथा अधिक चांगल्या पद्धतीने मांडली होती.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news