Bhumi Pednekar : ओह! भूमीला पाहून बसणार नाही विश्वास, फोटो तर पाहा ❤️ | पुढारी

Bhumi Pednekar : ओह! भूमीला पाहून बसणार नाही विश्वास, फोटो तर पाहा ❤️

पुढारी ऑनलाईन डेस्क : फॅट टू फिट असा प्रवास करणाऱ्या भूमी पेडणेकच्या नव्या लूकमुळे (Bhumi Pednekar) सर्वच जण आश्चर्यचकित होत आहेत. एकेकाळी बेढब असणारी भूमी आता खूपचं ग्लॅमरस दिसत आहे. विशेष म्हणजे ती पूर्वीपेक्षा खूप बारीक आणि सुंदर दिसतेय. आपल्या पहिल्या चित्रपटामध्ये ओव्हरवेट महिलाची भूमिका साकारून तिने हे सिध्द केलं होतं की, या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत ती अन्य अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. भूमीला बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये येऊन काही वर्षे झाली आहेत. इतक्या कमी वयात तिने ऑनस्क्रीन ज्या प्रकारे भूमिका साकारल्या, त्या वाखाणण्याजोगे आहेत. स्क्रीनवर साकारलेल्या भूमिकांमुळे तिचं करिअर ऊंचीवर आहे. आपल्या पहिल्या चित्रपटानंतर तिने आपल्या वजनावर लक्ष केंद्रीत केलं होतं. वजन कमी करून ती आपल्या ओरिजन बॉडीशेपमध्ये आली. (Bhumi Pednekar)

भूमी ऑनस्क्रीन डी-ग्लॅम भूमिका करत राहते, पण खऱ्या आयुष्यात ती फॅशन दिवा आहे. चित्रपटाचे प्रमोशन असो किंवा पार्टीला जाणे असो, भूमीचे ग्लॅमरस डिझायनर पोशाख आणि तिची शैली नेहमीच आश्चर्यकारक असते. भूमी फक्त वन पीस किंवा साडी नेसत नाही, तर तिला इंडो-वेस्टर्न पोशाखदेखील घालायला आवडतात. ही स्टाईलदेखील तिला शोभते. तिच्या काही फॅशनेबल ड्रेसची ही फोटो आहेत. ती पाहून असे म्हणता येईल की फॅशन आणि स्टाईलच्या बाबतीत भूमीकडे उत्तर नाही.

दम लगा के हईशा या चित्रपटात एका जाडजूड तरुणीची भूमिका करणारी भूमी पेडणेकर खरं तर ग्लॅमरस आहे, हे चित्रपटाच्या रिलीजनंतरच समोर आले. हॉटनेसच्या बाबतीत भूमी मोठ्या अभिनेत्रींशी स्पर्धा करते.

आता तिने चोली दुपट्टा आणि धोतीमध्ये फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये ती बोल्ड आणि हॉट दिसते. याच ड्रेसमधील आणखी एक व्हिडिओ शेअर करत तिने ‘Just some posing and promoting #rakshabandhan’ अशी कॅप्शन लिहिलीय. भूमी या धोती लेहेंगा आणि बॅकलेस ब्लाऊज लूकमध्ये अतिशय स्टायलिश दिसते. भूमीची ही स्टाईल पाहण्यासारखी आहे. खऱ्या आयुष्यात भूमीला बिकिनी घालायला आवडते. या ब्राऊन कलरच्या बिकिनीमध्ये भूमी खूपच हॉट दिसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

Back to top button