दहीहंडीसाठी आता स्थानिक गोविंदा पथक; ताथवडे येथील तरुणांचा पुढाकार

दहीहंडीसाठी आता स्थानिक गोविंदा पथक; ताथवडे येथील तरुणांचा पुढाकार
Published on
Updated on

वर्षा कांबळे

पिंपरी : शहरात दरवर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आजपर्यंत दहीहंडी फोडण्याचा मान आणि बक्षीस हे बाहेरील गोविंदा पथक येऊन घेऊन जातात. शहरात यापूर्वी एकही स्थानिक गोविंदा पथक नव्हते. ताथवडे गावातील काही तरुणांनी एकत्र येऊन शहरातील एकमेव, असे गोविंदा पथक तयार केले. गेल्या सहा वर्षांपासून दहीहंडीमध्ये त्यांचा सहभाग असतो.

या पथकाचे नाव नरसिंह गोविंदा पथक, असे आहे. ताथवडे गावच्या ग्रामदैवताच्या नावावरून पथकाचे नाव ठरविण्यात आले आहे. ताथवडे येथील शाळेच्या मैदानावर पथकाचा सराव सुरू आहे. सध्या पाच थराच्या दहीहंडीचा सराव ते करत आहेत. शहरामध्ये आता ढोलताशा पथकाबरोबर गोविंदा पथकेही तयार होऊ लागली आहेत. सायंकाळी 14 ते 35 वयोगटातील गोविंदा आपली शाळा व काम सांभाळून सराव करत आहेत.

कोरोनामुळे दोन वर्षे दहीहंडी साध्या पद्धतीने साजरा केला. यावर्षी या उत्सवाची धूम असणार आहे. मोठमोठ्या सेलिबि—टी, दहीहंडी फोडण्यासाठी मंडळांना लाखोंच्या सुपार्‍या आहेत. त्यामुळे गोविंदा पथकांमध्ये चुरस असणार आहे. गोविंदा पथकातील जाणकार इतर गोविदांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 1-2 महिने आधीपासूनच त्यांची पूर्वतयारी सुरू होते. वरच्या थरातील लहान गोविंदांसाठी खास प्रशिक्षण दिले जाते. बहुतांश गोविंदा हे व्यायामशाळेतील कसलेल्या शरीरसौष्ठवाचा पुरेपूर उपयोग करतात. थर कोसळून होणार्‍या दुखापती न होण्यासाठी पथकाकडून पूर्ण काळजी घेतली जाते.

शहरातील दहीहंडी उत्सवात आतापर्यंत 15 ते 20 बक्षिसे मिळविली आहेत. आम्हाला पथक सुरू करण्यासाठी कोणी गॉडफादर नव्हते. आम्ही मुलांनीच ठरविले पथक तयार करायचे आणि तीन वर्षांतच आम्ही पाच थराची दहीहंडी रचली. मात्र, दोन वर्षे कोरोनामुळे सराव करता आला नाही. नाही तर सात ते आठ थरांची दहीहंडी सहज रचू शकलो असतो. यंदा सहा थराची दहीहंडी रचणार आहोत.

                                                – राज वड्डे , सदस्य, नरसिंह गोविंदा पथक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news