kangana ranaut : श्रद्धा वालकरचं पत्र वाचून कंगना भावूक

कंगना रानौत
कंगना रानौत

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली पोलिस सध्या Shraddha Walkar मर्डर केसचा तपास करत आहे. श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर Aaftab Poonawala ने तिची हत्या केली. यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून दिल्ली नजीकच्‍य जंगलात फेकले होते. क्रौर्याचा परिसीमा गाठणार्‍या या घटनेने संपूर्ण देश हादरला. आता  श्रद्धा मर्डर केसमध्ये एक नवी माहिती समोर आ‍ली आहे. श्रद्धाने २०२० मध्ये एक पत्र लिहिलं होतं, ज्याची कॉपी व्हायरल होत आहे. या कॉपीला बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौतने (kangana ranaut) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत एक भावूक पोस्ट लिहिली आहे. (kangana ranaut)

कंगनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, 'हे ते पत्र आहे, जे श्रद्धाने २०२० मध्ये मदत करण्यासाठी पोलिसांना लिहिलं होतं. तो नेहमी तिला भीती दाखवायचा आणि तुकडे-तुकडे करण्याची धमकी द्यायचा. तिने लिहिलं आहे की, तो तिला ब्लॅकमेल करत होता; पण कसं काय ठाऊन त्याने श्रद्धाचं ब्रेनवॉश केलं आणि आपल्यासोबत दिल्लीत घेऊन गेला. ती कमकुवत किंवा भावनिकदृष्ट्या गरजू नव्हती. ती एक मुलगी होती, या जगात जगण्यासाठी जन्माला आली होती. … स्त्री ही आई असते, ती कुठलाही कधीही भेदभाव करत नाही. ती परींच्या देशात विश्वास ठेवते आणि तिचं हे म्हणणं आहे की, जगाला योग्य दिशा देण्यासाठी प्रेमाची आवश्यकता आहे.

कंगनाने पुढे लिहिलंय-'ती कमकुवत नव्हती. ती केवळ एक मुलगी होती, ती एका परीच्या कहाणीमध्ये राक्षसांशी भांडणं करत आहे.' कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर युजर्सकडून प्रतिक्रिया येत आहेत.

श्रद्धा वॉलकरच्या २३ नोव्हेंबर, २०२० रोजी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं की, आफताब पूनावाला तिच्याशी गैरवर्तन करतो आणि मारतो. यासोबतच श्रद्धाने लिहिले की, आफताबने तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news