Richa Chadha apologies : वाढता वाद पाहून रिचा चड्ढाचा माफीनामा | पुढारी

Richa Chadha apologies : वाढता वाद पाहून रिचा चड्ढाचा माफीनामा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा हिच्या एका ट्विटने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. (Richa Chadha apologies) खरंतर, पीओकेवर लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलेल्या विधानावर रिचाने वादग्रस्त ट्विट केले होते. गलवान व्हॅलीचा उल्लेख करत तिने ट्विटमध्ये ‘Hi’ लिहिलं होतं. मात्र, वाढता वाद पाहता तिने ट्विट डिलीट करत माफी मागितली आहे. (Richa Chadha apologies)

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा तिच्या एका ट्विटमुळे ट्रोल झाली आहे. रिचाने लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली होती, ज्यात त्यांनी म्हटले होते की, ”भारतीय सैन्यदल पाकव्याप्त काश्मीरचा ताबा घेण्यास तयार, आदेशाची वाट पाहतोय, आदेश पूर्ण करण्यासाठी तयार आहे.”

आर्मी ऑफिसरच्या वक्तव्याचे ट्विट रिट्विट करत बॉलीवूड अभिनेत्री रिचाने लिहिले, “गलवान ‘हाय’ म्हणतो.” तिने हे ट्विट करताच सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. २०२० मध्ये भारत आणि चीन यांच्यातील संघर्षाचा अपमान केल्याबद्दल सोशल मीडिया युजरनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. लोकांनी लिहिले की, गलवानमध्ये शहीद झालेल्या आमच्या जवानांची खिल्ली उडवली जात आहे. मात्र, हा गोंधळ पाहून रिचा चढ्ढाने नंतर हे ट्विट डिलीट केले आणि माफीही मागितली.

अभिनेत्रीने माफी मागितली

याबद्दल रिचाने माफी मागितली आणि ट्विटद्वारे लष्कराचा अपमान करण्याचा माझा उद्देश नव्हता असे म्हटले आहे. माझे तीन शब्द वादात ओढले गेले. कोणाला वाईट वाटले असेल तर क्षमस्व. ती म्हणाली की, माझे आजोबा स्वतः सैन्यात होते आणि लेफ्टनंट कर्नलच्या पदावर होते. भारत-चीन युद्धात त्यांच्या पायाला गोळी लागली होती. माझे मामा सुद्धा पॅराट्रूपर होते. माझ्या रक्तात आहे. सैन्यात कोणी शहीद झाले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा फटका बसतो. सैन्यात कोणी जखमी झाले तरी वेदनादायक असते. हा माझ्यासाठी भावनिक मुद्दा आहे.

Back to top button