Kantara Climax : शूटिंगवेळी ऋषभ शेट्टीचे दोन्ही खांदे निखळले अन्

kantara movie
kantara movie

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'कांतारा' चित्रपटाची कथा कर्नाटकातील किनारपट्टी भागातील आहे. त्याच्या क्लायमॅक्स सीनमध्ये गावकरी आणि खलनायक यांच्यातील वाद दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाचे खूप कौतुक झाले आहे. (Kantara Climax) ऋषभ शेट्टीने क्लायमॅक्स सीनबद्दल एक अविस्मरणीय गोष्ट सांगितली आहे. सीनच्या शूटिंगदरम्यान एक धोकादायक प्रसंग घडला होता, जो कधीही विसरू शकत नाही, असा प्रसंग आहे. (Kantara Climax)

अभिनेता ऋषभ शेट्टीच्या 'कंतारा' या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केला आहे. या चित्रपटाने जगभरात ४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या वर्षातील बॉक्स ऑफिसवरील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आता 'कांतारा' बनला आहे. दरम्यान, ऋषभ शेट्टीने चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनबाबत मोठा खुलासा केला आहे.

कांतारामध्ये काय आहे खास?

'कांतारा' ची कहाणी मूळत: कर्नाटकच्या किनाऱ्यालगतची आहे. जमिनीचे राजकारण आणि मानव, निसर्ग या गोष्टीशी संबंधित आहे. कर्नाटकच्या केराडीमध्ये सेट आणि चित्रण करण्यात आले आहो. हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी रिलीज झाला अशून तो एक ॲक्शन-थ्रिलर आहे. ऋषभने याची कहाणी लिहिली आणि दिग्दर्शितही केली. निर्मिती विजय किरागंदूर यांची आहे.

'कांतारा' चित्रपटाची कथा कोस्टल कर्नाटकातील आहे. यामध्ये लोक जुन्या कथांवर विश्वास ठेवतात. चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनमध्ये गावकरी आणि खलनायक यांच्यातील वादाचे चित्रण आहे.

शूटिंग दरम्यान विहीर रिकामी केली

एका मुलाखतीदरम्यान ऋषभ शेट्टीने सांगितले की, ' शूटिंगवेळी एक सीक्वेन्स खूप कठीण होता. कारण तो ३६० डिग्री शॉट्स आणि पावसाचा इफेक्ट असलेला सिंगल शॉट होता. त्या ठिकाणी पाणी नेणे फार कठीण होते. त्यामुळे आम्ही तेथील ग्रामस्थांना तेथील विहिरीतून पाणी काढता येईल का, अशी विचारणा केली. ६ ते ७ दिवस शूट चालले आणि आम्ही तिथले पाणी वापरले. शूट संपेपर्यंत विहिरीतील पाणी संपले होते आणि विहिर रिकामी झाली होती.

…अन् दोन्ही खांदे निखळले

ऋषभने पुढे सांगितले की, शूटिंगदरम्यान त्याचे दोन्ही खांदे निखळले होते. पण तरीही तो काम करत राहिला. तो म्हणाला, 'त्या सीनची रिहर्सल करताना मला खांद्याचा त्रास झाला होता. ३६० डिग्री शॉट दरम्यान माझा खांदा निखळला होता. दुसर्‍या दिवशी, दुसर्‍या सीक्‍वेन्‍सचे शूटिंग करत असताना माझा दुसरा खांदाही निखळला. माझे दोन्ही खांदे निखळले होते, पण मी शूटिंग सुरूच ठेवले.

'कांतारा'ने आतापर्यंत जगभरात ४०० कोटींची कमाई केली आहे. यासह, हा आतापर्यंतचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने यावर्षी आलेल्या सर्व हिंदी चित्रपटांना मागे टाकले आहे. 'कंतारा' २४ नोव्हेंबर रोजी प्राईम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news